80 Primary School Girls Poisoned
80 Primary School Girls Poisoned

Report: तालिबान शासनात 80 अफगाण मुलींना विषबाधा, रुग्णालयात केले दाखल

अफगानिस्तानातून धक्कादायक माहिती समोर

अफगानिस्तानातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 80 अफगाण मुलींना विषबाधा झाली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणयात आलं आहे. संशयाची सुई तालिबानकडे वळत आहे. पण तालिबानने दावा फेटाळला आहे. या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचे म्हटले आहे. (80 Primary School Girls Poisoned Hospitalised in Northern Afghanistan )

अफगाणिस्तानमध्ये सुमारे 80 शाळकरी मुलींना विषबाधा झाली आहे. संशयाची सुई तालिबानकडे वळत आहे पण तालिबानने या घटनेत कोणताही सहभाग नाकारला आहे. उत्तर अफगाणिस्तानमधील त्यांच्या प्राथमिक शाळांवर झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत सुमारे 80 मुलींना विषबाधा झालीय. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे एका स्थानिक शिक्षण अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. (Latest Marathi News)

प्रांतीय शिक्षण विभागाचे संचालक मोहम्मद रहमानी यांनी सांगितले की, संघचारक जिल्ह्यात इयत्ता 1 ते 6 मधील विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. तसेच, नसवान-ए-कबोद आब शाळेतील 60 आणि नसवान-ए-फैजाबाद शाळेतील आणखी 17 मुलांना विषबाधा झाली होती, असे फॉक्स न्यूजने वृत्त दिले आहे.(Latest Marathi News)

80 Primary School Girls Poisoned
Pakistan Crisis: 5 हजारांची नोट घेऊन फिरत आहेत उपाशी पाकिस्तानी, आता वापरणार मोदींचा फॉर्म्युला?

दोन्ही प्राथमिक शाळा एकमेकांच्या जवळ आहेत आणि त्यांना एकामागून एक लक्ष्य करण्यात आले, असल्याचा दावा करण्यात आला आहे. विभागाचा तपास चालू आहे आणि प्राथमिक चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रागाच्या भरात अज्ञात वक्तीने हल्ला करण्यासाठी तृतीय पक्षाला पैसे दिले होते.

80 Primary School Girls Poisoned
Japanese whiskey : जपानी व्हिस्की इतकी महाग का असते?

ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासून आणि अफगाण महिला आणि मुलींच्या अधिकारांवर तसेच स्वातंत्र्यावर कारवाई सुरू आहे. मुलींना विद्यापीठासह सहाव्या इयत्तेपर्यंतच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली आहे आणि महिलांना बहुतांश नोकऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे, असे फॉक्स न्यूजने वृत्त दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com