युरोप आणि अमेरिकेतले लोक ठरताहेत कोरोनाचे सर्वाधिक बळी; आकडे सांगतात...

Corona-Death
Corona-Death

पॅरिस : कोरोना व्हायरस या जागतिक महामारीमुळे आतापर्यंत ३ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये कोरोना उद्भवला आणि आता संपूर्ण जगाला या कोरोनाने आपल्या विळख्यात ओढले आहे. चीनपासून सुरवात केल्यानंतर आता कोरोनाने अमेरिकेत आपला डेरा टाकल्याचे दिसत आहे.

विशेष महत्त्वाची गोष्ट ही की, मृत झालेल्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक संख्या ही युरोप आणि अमेरिका या दोन खंडांमधील आहे. आफ्रिका आणि आशिया या खंडातील मृत होणाऱ्यांचे प्रमाण हे युरोप आणि अमेरिकेपेक्षा कमी आहे. एएफपी टॅलीच्या आकडेवारीनुसार, शनिवारी (ता.९) सायंकाळपर्यंत जगभरात मृत पावलेल्यांपैकी ८५ टक्के लोक हे युरोप आणि अमेरिकेतील आहेत. 

जगभरात आतापर्यंत ३९,५५,६३१ कोरोना पॉझिटिव्ह केसेस आढळून आल्या असून २,७५,०१८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारपर्यंत (ता.८) ३८,७७,७७२ पॉझिटिव्ह केसेस आढळल्या. त्यापैकी २,७०,९२७  जणांचा मृत्यू झाला होता. 

कोरोनाने युरोपची सर्वात जास्त हानी केली आहे. युरोपमध्ये कोरोनाच्या १६,९९,५६६ केसेस समोर आल्या आहेत. त्यापैकी १,५४,३१३ लोक मृत पावले आहेत. दुसरीकडे अमेरिका या देशात आतापर्यंत सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे. अमेरिकेतील ७७,२८० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापाठोपाठ ब्रिटन ३१,२४१, इटली ३०,२०१, स्पेन २६,४७८ आणि फ्रान्समधील २६,२३० लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

शुक्रवारी हाती आलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास युरोप आणि अमेरिकेतील संख्या वाढत असल्याचे दिसून येते. शुक्रवारपर्यंत युरोपमध्ये १६,७८,४८५ कोरोना केसेस आढळून आल्या होत्या. तर १,५३,३६७ जणांचा मृत्यू झाला होता. तर अमेरिकेत ७५,७८१, ब्रिटन ३१,२४१, इटलीत ३०,२०१, स्पेनमध्ये २६,२९९ आणि फ्रान्समधील २५,९८७ नागरिक कोरोनाचे बळी ठरले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com