Video: माझं नेहमीच तुझ्यावर प्रेम असेल...

वृत्तसंस्था
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

माझं नेहमीच तुझ्यावर प्रेम असेल, असे म्हणत 87 वर्षीय पत्नीला धीर देत जेवणाचा घास भरवला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, याला म्हणतात खरं प्रेम अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

वुहान (चीन) : माझं नेहमीच तुझ्यावर प्रेम असेल, असे म्हणत 87 वर्षीय पत्नीला धीर देत जेवणाचा घास भरवला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, याला म्हणतात खरं प्रेम अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

मेट्रोत कोरोना-कोरोना म्हणून ओरडला अन्...

चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार उडवला आहे. या आजारामुळे अनेकजण मृत्युमुखी पडले असून, अनेकांवर उपचार सुरू आहेत. व्हायरस वेगाने पसरत असल्याने भीतीचे वातावरण आहे. अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापूर्वीही एका वृद्ध दांपत्याने रुग्णालयात आपले प्रेम व्यक्त करत शेवटचा श्वास घेतला होता.

पीपल्स डेली चायनाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे की, 'माझं नेहमीच तुझ्यावर प्रेम असेल. कोरोना व्हायरसने ग्रस्त असलेल्या 87 वर्षीय व्यक्तीला सलाइन लावलेले आहे. तशाही अवस्थेत तो पत्नीला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचला. शिवाय, पत्नीला घास भरवला आणि धीरही दिला आणि तु लवकर ठिक होशील असे म्हटले आहे.

प्रेमविवाह केला अन् कायमचाच निघून गेला...

संबंधित व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. नेटिझन्स व्हिडिओ शेअर करताना दिसत आहेत. प्रतिक्रिया व्यक्त करताना नेटिझन्स म्हणातात की, हे खरं प्रेम आहे. दोघेही लवकर ठीक व्हावेत अशी प्रार्थना. खूपच भावूक करणारे आणि डोळ्यात पाणी आणणारे दृश्य आहे. लवकर बरे व्हा.

व्हिडिओ पाहून डोळ्यात येतं फक्त पाणीच...

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे 1600 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, 68 हजार जणांना याची बाधा झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने आणखी 2009 रुग्णांना बाधा झाल्याचे सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 87 year old china man feeding coronavirus infected wife in hospital