पॉर्नहबवर 'हा' शिक्षक गणित शिकवतोय! करतोय दरवर्षी दोन कोटींची कमाई

'पॉर्नहब'वर 'हा' शिक्षक गणित शिकवतोय! करतोय दरवर्षी दोन कोटींहून अधिक कमाई
'हा' शिक्षक गणित शिकवतोय!
'हा' शिक्षक गणित शिकवतोय!Sakal
Summary

पॉर्नहबसारख्या प्लॅटफॉर्मचा उपयोग गणित शिकवण्यासाठी केला जाऊ शकतो, असा कधी विचार केला आहात का?

पॉर्नहबसारख्या प्लॅटफॉर्मचा उपयोग गणित शिकवण्यासाठी केला जाऊ शकतो, असा कधी विचार केला आहात का? पॉर्नहब हा शब्द ऐकल्यावरच अनेकांच्या मनात एकच गोष्ट येते ती म्हणजे पोर्नोग्राफी. पण तुम्हाला हे जाणून आश्‍चर्य वाटेल, की तैवानचे (Taiwan) गणित (Mathematics) शिक्षक चांगशू (Changshu) हे पॉर्नहबवर गणिताचे धडे देतात अन्‌ दरवर्षी दोन कोटींहून अधिक रुपयांची कमाई करतात!

कोणालाही पॉर्नहबवर गणिताचे व्हिडिओ पाहावेसे वाटेल का? मात्र चांगशू यांच्या व्हिडिओंना एक दशलक्ष व्ह्यूज मिळतात. या माध्यमातून ते दरवर्षी सुमारे दोन कोटी रुपयांची कमाई करतात. लोकांना आपली गणिती कौशल्ये वाढवायची असतात, त्यासाठी कोणताही प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी वर्ज्य नसते, हे यातून दिसून येते.

changshumath666 या हॅंडलखाली गणित शिकवणाऱ्या चांगशूचे पॉर्नहबवर व्हेरिफाइड अकाउंट आहे. विशेष म्हणजे, त्यांनी XVideos सह इतर पॉर्न साइट्‌सवरही गणित शिकवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना तसा प्रतिसाद मिळाला नाही. इतर साइट्‌स प्रौढ नसलेल्या क्‍लिपला परवानगी देत नाहीत. मात्र पॉर्नहबकडे असा कोणताही पूर्वग्रह नाही, कारण पॉर्नहबलाही वाटते, की त्यांच्या युजर्सने गणित देखील शिकावे.

'हा' शिक्षक गणित शिकवतोय!
50 एअर होस्टेस पोहोचल्या भरचौकात अन् त्यांनी कपडेच उतरवायला सुरुवात केली

चांगशू यांनी मेल मॅगझिनला सांगितले की, 'अडल्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर खूप कमी लोक गणित शिकवतात आणि त्यावर व्हिडिओ पाहणारे खूप लोक आहेत. मला वाटले, की जर मी माझे व्हिडिओ येथे अपलोड केले तर बरेच लोक ते पाहतील.'

चांगशू आपल्या अकाउंटच्या माध्यमातून "खूप परिश्रम करा, खूप परिश्रम करा' असा संदेश देतात. त्यांच्या सर्व व्हिडिओंमध्ये ते राखाडी रंगाचा हुडी आणि चष्म्यामध्ये दिसतात. ते ग्रीन बोर्डवर गणिताचे प्रश्नही सोडवतात. ते म्हणतात, की लोकांना माझ्या व्हिडिओंमध्ये स्वारस्य नसेल, परंतु त्यांना हे माहीत असले पाहिजे की अडल्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर कॅल्क्‍युलस शिकवणारे शिक्षक आहेत. चांगशू यांचा असा विश्वास आहे, की लोक अडल्ट साइटवर त्यांच्या व्हिडिओंवर येतात, कारण त्यांचे अर्ध्याहून अधिक दर्शक पॉर्नहबवर शिकवलेले अवघड गणित पाहण्याच्या नाविन्यतेकडे झुकतात.

'हा' शिक्षक गणित शिकवतोय!
जाळ्यात सापडलेला 'तो' साधारण साप नव्हे, तर..!

पॉर्नहबवर त्यांचे व्हिडिओ अधिक लोकांनी पाहावेत अशी चांगशू यांची इच्छा आहे; कारण ते चांगशू यांना वर्षाला $250,000 उभे करण्यास मदत करतील, ज्याचा वापर चांगशू त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी व गणिताचे आणखी व्हिडिओ तयार करण्यासाठी करू शकतील. ते म्हणतात, मला पॉर्नहबवर गणित शिकवायचे नव्हते. मला जगाला सांगायचे होते की मी तैवानमधील एक शिक्षक आहे, जो कॅल्क्‍युलस खूप चांगले शिकवू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com