प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू...

वृत्तसंस्था
सोमवार, 23 मार्च 2020

कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार उडावला असून, उपाययोजना आखण्यासाठी विविध देश पुढाकार घेताना  दिसत आहेत. एका अभिनेत्रीच्या वडिलांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे, याबद्दलची माहिती तिने ट्विटरवरून दिली आहे.

लंडन: कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार उडावला असून, उपाययोजना आखण्यासाठी विविध देश पुढाकार घेताना  दिसत आहेत. एका अभिनेत्रीच्या वडिलांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे, याबद्दलची माहिती तिने ट्विटरवरून दिली आहे.

चीनने माहिती लपविली : ट्रम्प 

‘ट्रान्सफर्मर्स’ आणि ‘मॅन्सफिल्ड पार्क’ या चित्रपटात भूमिका साकारलेली हॉलिवूड अभिनेत्री सोफिया माइल्स हिच्या वडिलांचे कोरोना विषाणूमुळे निधन झाले आहे. वडिलांच्या निधनामुळे सोफियाला प्रचंड धक्का बसला असून, तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने ट्विट करून म्हटले आहे की, 'माझे वडील पीटर माइल्स यांच्या आत्म्यास शांती लाभो. काही तासांपूर्वीच माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. कोरोना विषाणूमुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे.' दरम्यान, सोफियाच्या ट्विटनंतर अनेकांनी तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोना विषाणूची लागण झालेल्यांमध्ये काही सेलिब्रिटींचा समावेश आहे. यामध्ये हॉलिवूडमधील अभिनेता टॉम हॅक्स आणि त्याची पत्नी, अभिनेत्री रिटा विल्सन, एडरिस एल्बा, राशेल मॅथ्यू यांचा समावेश आहे. तर भारतात बॉलिवूड अभिनेत्री कनिका कपूरला करोना झाल्याचं समोर येत आहे.

जगाचे व्यवहार ठप्प; इटलीने मृतांच्या संख्येत चीनला टाकले मागे; आता बोलवले लष्कर

दरम्यान, चीनच्या वुहान शहरामधून फैलाव झालेल्या कोरोना विषाणू जगभर पसरू लागला आहे. कोरोनाचा इटलीला मोठा फटका बसला आहे. चीनसह भारत, अमेरिका, इटली, इराण यासारखे देश करोनाचा फैलाव रोखण्यासाठी  वेगवेगळे उपाय करत आहेत. परंतु तरीदेखील या देशांमधील काही नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress sophia myles father dies of covid 19 corona virus