दहशतवादाचा मुलांवर विपरीत परिणाम

WHO
WHO

न्यूयॉर्क - सीमेपलीकडे पसरलेल्या दहशतवाद्यांच्या जाळ्यामुळे मुलांवर सर्वाधिक वाईट परिणाम होत आहे. शांततेलाही धोका निर्माण झाला आहे. दहशतवादाचे गुन्हेगार, सहकारी, प्रायोजक ठरविण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रातील सदस्य देशांना केले. सुरक्षा परिषदेच्या ‘मुले आणि शाळांविरुद्धचा सशस्त्र संघर्ष, हल्ले; बालकांच्या अधिकारांचे तीव्र उल्लंघन’ या विषयावर भारताने निवेदनाद्वारे आपली भूमिका मांडली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दहशतवादी जाळ्यामुळे मुलांना भीती व अनिश्चिततेच्या वातावरणात राहावे लागत असल्याने त्यांच्यावर वाईट परिणाम होत आहे. त्यांना शिक्षणापासूनही वंचित राहावे लागत आहे, असेही भारताने अधोरेखित केले. सुरक्षा परिषदेने बंदी घातलेले दहशतवादी किंवा संघटना बालकांच्या अधिकारांची पिळवणूक करण्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदार आहेत, असेही म्हटले आहे.

परिषदेने दहशतवादाचे गुन्हेगार, प्रायोजक ठरवून मुलांच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी तीव्र राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे. यात परिषदेनेच गुन्हेगार ठरविलेल्यांचा समावेश आहे, असेही भारताने निदर्शनास आणले. जगात अनेक भागात दहशतवादी संघटनांकडून मुलांना धोका आहे. त्याचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक कृती आणि अधिक मान्यतेचे महत्त्व भारत समजू शकतो. परिषदेने आव्हानात्मक परिस्थितीत मुलांचे रक्षण करणाऱ्यांना आवश्यक स्रोत, प्रशिक्षण मिळण्याचीही खात्री करावी. कोरोना साथीने मुलांच्या रक्षणाचे आव्हान आणखी तीव्र केले, असेही भारताने निदर्शनास आणले. 

पाककडून दहशतवादाला चिथावणी
भारताने या वेळी पाकिस्तानवरही निशाणा साधला. पाकिस्तान आपल्या भूमीत दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकमधील मानवाधिकाराचे उल्लंघनही शोचनीय आहे. जागतिक समुदायासाठीही पाकिस्तानकडून धार्मिक व वांशिक अल्पसंख्याकांना दिली जाणारी भेदभावाची वागणूक चिंतेचा विषय बनली आहे,असे भारताने म्हटले. पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत मुनिर अक्रम यांनी जम्मू काश्मीर, भारतातील अयोध्या मंदिराचा उल्लेख केल्यावर भारताने खडे बोल सुनावले. 

पाकिस्तानने कारवाई करावी
वॉशिंग्टन - पाकिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी होणारा वापर थांबविण्यासाठी पाकिस्तान सरकारने तातडीने ठोस आणि शाश्‍वत कारवाई करावी, अशी मागणी भारत आणि पाकिस्तानने आज केली. तसेच, मुंबईवरील २६/११ चा हल्ला आणि पठाणकोटवरील हल्ल्याच्या सूत्रधारांसह इतर सर्व दहशतवाद्यांना शासन करावे, अशी मागणीही करण्यात आली. भारत-अमेरिका दहशतवादविरोधी समितीची १७ वी बैठक काल झाली, त्यानंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करुन ही मागणी केली आहे. यावेळी दोन्ही देशांनी दहशतवादाचा निषेध केला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com