अफगाण परिषदेकडून तालिबानी कैद्यांच्या सुटकेचा निर्णय; अध्यक्ष घनी यांचे हिंसाचार थांबविण्याचे आवाहन

अफगाण परिषदेकडून तालिबानी कैद्यांच्या सुटकेचा निर्णय; अध्यक्ष घनी यांचे हिंसाचार थांबविण्याचे आवाहन

काबूल- शेकडो प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेल्या अफगाणिस्तानच्या पारंपरिक परिषदेत ४०० तालिबानी कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशाच्या पाश्तो आणि फारसी या अधिकृत भाषांमध्ये याबाबतची घोषणा वाचून दाखविण्यात आली. त्यानंतर, तालिबानबरोबर तत्काळ चर्चा आणि युद्धबंदीही करण्यात आली. या निर्णयामुळे अफगाणिस्तानमधून आपल्या फौजा मागे घेऊन सर्वांत प्रदीर्घ लष्करी मोहिम संपविण्याच्या दृष्टीने अमेरिकेने एक पाऊल टाकले आहे. 

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घानी या निर्णयाचे स्वागत करत तालिबानला संघर्ष थांबविण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे, तालिबानचा राजकीय प्रवक्ता सुहैल शाहीननेही हे चांगले पाऊल असल्याचे म्हटले आहे. तालिबानच्या कैद्यांना सोडल्यावर आठवडाभरात चर्चा सुरू होण्याची अपेक्षाही त्याने व्यक्त केली. सध्यातरी अफगाण सरकार आणि तालिबादमधील चर्चेसाठी तारीख ठरविली नसली तरी ती पुढील आठवड्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. तालिबानचे राजकीय कार्यालय असलेल्या कतारमध्ये ही चर्चा पार पडू शकते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेनेच जिरगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिषदेला तालिबानबरोबरची चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी कैद्यांची मुक्तता करण्याचे आवाहन केले होते. अमेरिका व तालिबानमधील चर्चेनुसार अफगाण सरकारने पाच हजार व तालिबानने एक हजार सरकारी कर्मचारी व लष्करी जवानांची सुटका करण्याचे ठरले होते. मात्र, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी तालिबान कैद्यांवरील गंभीर गुन्हयांमुळे सुटकेबाबत परिषद बोलविण्याचे आवाहन केले होते. 

तालिबानच्या कैद्यांना सोडण्याचे पाऊल सकारात्मक आहे. कैद्यांच्या सुटकेनंतर अफगाण सरकारबरोबर आठवडाभरात चर्चा होऊ शकते. अमेरिकेबरोबरच्या करारासाठीही तालिबान वचनबध्द असून शस्त्रसंधी हा त्याचाच एक भाग आहे. 
सुहैल शाहीन, राजकीय प्रवक्ता, तालिबान 

  • जिरंगा ही पारंपरिक परिषद अफगाणिस्तानला ४५ लाख डॉलरची मदत करणार 
  • काबूलची निम्मी लोकसंख्या कोरोनाग्रस्त 
  • अमेरिका-तालिबानमधील करारानुसार अफगाणिस्तान सरकार पाच हजार तालिबान्यांची सुटका करणार 
  • तालिबान अफगाणिस्तानच्या १००० जवानांची मुक्तता करणार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com