ब्रेकिंग न्यूज! कार बॉम्ब हल्ल्यात 26 सुरक्षा कर्मचारी ठार

Afghanistan car bomber attack.jpg
Afghanistan car bomber attack.jpg

काबूल: एका आत्मघाती कार बॉम्बरने रविवारी अफगाणिस्तानातील (Afghanistan) लष्करी तळावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये किमान 26 सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.

हा हल्ला गझनी (Ghazni city) शहराच्या जवळ झाला आहे. या भागात तालिबान (Taliban) आणि सैन्यांमध्ये वारंवार लढाई होत असते.सध्या अफगाण सरकार आणि तालिबानमध्ये शांततेसाठी चर्चा सुरु आहे. पण आतापर्यंत मागील दोन दशकांत लाखो लोकांचा बळी गेला आहे.

'आतापर्यंत या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण सुरक्षा अधिकारी आहेत', अशी माहिती गजनी हॉस्पिटलचे संचालक बाज मोहम्मद हेमत यांनी एएफपीला सांगितले. गजनी प्रांतीय परिषदेचे सदस्य नासीर अहमद फकिरी यांनी या हल्ल्याला आणि मृताच्या संख्येला दुजोरा दिला आहे.

गृह मंत्रालयाचे प्रवक्ते तारिक एरियन यांनी सांगितले की, हा हल्ल्यात स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा स्फोट घडवून आणला आहे. आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली नाही. गझनी हल्ल्याच्या अगोदर बामियान या ऐतिहासिक शहरात झालेल्या बॉम्बस्फोटांनं 14 जणांचा मृत्यू झाला होता.

मागील काही दिवसांपासून अफगाणिस्तानात सरकार आणि तालिबानच्या नेत्यांमध्ये शांततेसाठी चर्चा सुरु आहे. अमेरिकेनेही अफगाणिस्तानातील सैन्य कमी करण्यास सुरुवात केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार 2 हजार ट्रुप्स अमेरिकेने माघार घेतले आहेत. यास पेंटागॉननेही दुजोरा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com