काबूलमध्ये आत्मघातकी हल्ल्यात 24 मृत्युमुखी; 40 जखमी

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

मागील महिन्यातील एका हल्ल्यात प्रमुख शिया मुस्लिम मौलवी रमझान हुसेनजादा मारले गेले. ते हजारा समुदायाचे नेते होते.

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या पश्चिम भागामध्ये एका आत्मघातकी हल्लेखोराने कार बॉम्बचा स्फोट घडवून आणला. त्यामध्ये 24 लोकांचा मृत्यू झाला, तर इतर चाळीसहून अधिक लोक जखमी झाले. 

या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा हल्ला नेमका कोणावर करायचा होता ते लक्ष्य अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांनी वृत्तसंस्थेला सांगितले. 

या स्फोटात मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हजारा समुदायाचे नेते मोहंमद मोहकिक यांच्यासह अनेक महत्त्वाचे अफगाण नेते पश्चिम काबूलमध्ये राहतात. स्थानिक पोलिसांनी या परिसराला वेढा दिला आहे. या प्रांतात सातत्याने आत्मघातकी हल्ले होत आहेत. मागील महिन्यातील एका हल्ल्यात प्रमुख शिया मुस्लिम मौलवी रमझान हुसेनजादा मारले गेले. ते हजारा समुदायाचे नेते होते. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्येच अशा हल्ल्यांमध्ये 1662 लोकांचे बळी गेले आहेत. 

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 


    स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
    Web Title: afghanistan news kabul suicide attack kills 24, injures many