
तालिबानने ५०० सरकारी अधिकाऱ्यांची केली हत्या, अमेरिकेला मदत केल्याचा आरोप
काबूल : काबूलवर नियंत्रण मिळवल्यानंतर आतापर्यंत तालिबानने जवळपास ५०० माजी सरकारी अधिकारी, सैन्य कर्मचाऱ्यांची हत्या केली आहे. तसेच अपहरण केले आहे. त्यांनी अमेरिकेला मदत केल्याचा आरोप केला जात आहे. वृत्तसंस्था एएनआयने न्यूयाॅर्क टाईम्सच्या एका तपासाचा हवाला देत तालिबानने (Taliban) सत्ता काबीज केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जवळपास ५०० माजी अधिकारी आणि सैन्य कर्मचाऱ्यांची हत्या केली किंवा त्यांना जबरदस्तीने गायब करण्यात आले. वृत्तानुसार केवळ बागलान प्रदेशात ८६ जणांच्या हत्येची पुष्टी करण्यात आली आहे. कंधारमध्ये ११४ लोक बेपत्ता होते. (Afghanistan Updates Around 500 Ex Afghan Officials Killed And Kidnapped By Taliban)
हेही वाचा: युक्रेनमध्ये रशियन सैन्याचे मोठे नुकसान, व्लादिमीर पुतीन भडकले
माफीच्या नावावर मृत्यूदंडाची शिक्षा
वृत्तानुसार तालिबानने सैनिकांना माफी देण्याच्या नावावर आमिष दाखवले. त्यांना स्थानिक पोलिस मुख्यालयात बोलवून मारहाण करण्यात आली. अनेकांचा मारहाणीत जीव गेला. तुम्ही अनेक वर्ष आमच्या विरोधात लढलात आणि आमच्या चांगल्या साथीदारांना मारले, असे म्हणत अनेकांना विहिरीत फेकून दिले. ही क्रूरता आजही सुरु आहे. ही आपबीती एका माजी अफगाण लष्कर कमांडरने रशियन (Russia) सरकारी वृत्तसंस्था स्पुटनिकला नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. स्पुटनिकच्या वृत्तानुसार तालिबानने सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटाची पडताळणी करण्यासाठी अनेक पद्धतींचा वापर केला आणि अनेक महिन्यांपर्यंत तपास केला. तपासात फाॅरेन्सिक व्हिडिओ परीक्षा, स्थानिक प्रसारमाध्यमांमधील वृत्त आणि पीडित, साक्षीदार आणि पीडितग्रस्तांचे कुटुंबातील सदस्यांची मुलाखतींचाही समावेश आहे.
हेही वाचा: काळजी, दगदग नको करु ! तब्येतीला जप, पंकजा यांचा भाऊ धनंजय मुंडेंना सल्ला
हजारो लोकांनी सोडले अफगाणिस्तान
तालिबानने अधिकाऱ्यांच्या हत्या केल्याचे वृत्त वारंवार फेटाळले आहे. सदरील आरोप निराधार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तालिबान प्रवक्ता म्हणाले, की तालिबानबाबत जगाची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांकडून अशा प्रकारचा प्रचार केला जात आहे. काबूलमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) मानवी हक्कांची स्थिती वाईट बनली आहे. हजारो अफगाण नागरिक सूडाच्या भीतीमुळे देश सोडला आहे.
Web Title: Afghanistan Updates Around 500 Ex Afghan Officials Killed And Kidnapped By Taliban
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..