अमेरिकेत दुकानाची लूट, गाड्यांची तोडफोड, आगी लावणे चालूच

पीटीआय
सोमवार, 1 जून 2020

संतापाचा उद्रेक 

  • उत्तर डाकोटात पोलिसांवर दगडफेक  
  • इंडियानापोलीसमध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू 
  • व्हाईट हाऊसबाहेर नॅशनल गार्डचे जवान तैनात 
  • फिलाडेल्फियात ११ पोलिस जखमी 
  • सॉल्टलेक सिटीमध्ये वाहने पेटविली 

न्यूयॉर्क - जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेमध्ये भडकलेला आंदोलनाचा वणवा अद्याप शमलेला नाही. न्यूयॉर्कपासून लॉस एंजेलिसपर्यंत हजारो लोकांनी शनिवारी पुन्हा उत्स्फुर्तपणे आंदोलन करताना सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करत जाळपोळ केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अनेक शहारांत दुकाने लुटण्यात आली, गाड्यांना आगी लावत  इमारतींवर दगडफेक करण्यात आली. संतप्त आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनाही लाठीहल्ला करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या आंदोलनाचे लोण आता अमेरिकेतील सतरा शहरांमध्ये पसरले असून दीड हजारांपेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. देशातील प्रमुख २५ शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.   

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना मोदी म्हणाले, ''सोबत बसून समोसा खाऊ!''

आंदोलकांना हवा बदल 
मिनिसोटा राज्यात आंदोलकांनी माघार घेण्यास नकार दिला असून ‘आम्हाला बदल हवा’ असल्याची मागणी त्यांनी केली आहे. संचारबंदी लागू करून काही होणार नाही, आम्हाला निर्बंध नको तर बदल हवा असल्याचे या आंदोलकांचे म्हणणे आहे. अनेक भागांत जॉर्जच्या समर्थनार्थ बॅनर झळकले असून त्यात ‘जॉर्जला न्याय द्या’ अशी मागणी करण्यात आली आहे. 

चीनच्या कुरापतीदरम्यान 'बलशाही भारत'चे दर्शन!, ही आहे भारताची ताकद

जॉर्ज यांना आदरांजली 
पोलिसांच्या मारहाणीत मरण पावलेल्या जॉर्ज फ्लॉइड यांना आज त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांनी श्रद्धांजली अर्पण केली. जॉर्ज हे एक प्रेमळ पिता आणि आपल्या कुटुंबाला आधार देणारे  कष्टाळू व्यक्ती होते अशा शब्दांत मित्रांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. प्रत्येकाने  माझ्या भावावर प्रेम केल्याचे फिलोनिज फ्लॉइड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation in America by george floyd death