घनी, अब्दुल्ला यांच्यात सत्ता वाटपासाठी करार

काबुल - अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी आणि अब्दुल्लाह अब्दुल्लाह करारवर स्वाक्षरी करताना.
काबुल - अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी आणि अब्दुल्लाह अब्दुल्लाह करारवर स्वाक्षरी करताना.

काबूल - अफगाणिस्तानातील तब्बल महिनाभराची राजकीय अस्थिरता संपुष्टात आली असून विद्यमान अध्यक्ष अश्रफ घनी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी आज सत्ता वाटपाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

अफगाणिस्तानला सध्या दोन  आघाड्यांवर लढावे लागत असून एकीकडे देशातील कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असताना दुसरीकडे देशात हिंसाचार देखील वाढला आहे.  आता सत्तेतील दुसरे वाटेकरी अब्दुल्ला हे तालिबान्यांसोबत चर्चा करून या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.  अफगाणिस्तानातील अध्यक्षीय प्रसादातील काही छायाचित्रे माध्यमावर व्हायरल झाली असून त्यात उभय नेते हे परस्परांच्या शेजारी बसून सत्ता वाटपाच्या करारावर स्वाक्षऱ्या करताना दिसत आहेत  यावेळी माजी अध्यक्ष हमीद करझाई यांच्यासोबत अफगाणिस्तानातील अन्य बडे नेते उपस्थित होते.

कसल्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय मध्यस्थीशिवाय हा करार पूर्ण झाला असल्याने देशाच्या इतिहातील हा महत्वाचा  दिवस आहे. हा भार आम्ही आमच्या खांद्यावर घेऊ.  हीच देवाची इच्छा असून हे ओझे देखील हलके होईल असा विश्वास घनी यांनी  
व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com