वायूप्रदूषणामुळे दरवर्षी ७० लाख लोकांचा मृत्यू - WHO

new delhi air pollution
new delhi air pollutione sakal

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी हवेच्या गुणवत्तेची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यामध्ये सहा धोकादायक प्रदूषकांची (pollutant) सुधारीत पातळीतबद्दल सांगण्यात आले आहे. या सहा प्रदूषकांमुळे मानवी आरोग्यास धोका आहे. तसेच या प्रदूषकांमुळे उद्भवलेल्या आजारातून दरवर्षी जगभरातील ७० लाख लोकांचा अधिक लोकांचा मृत्यू होत असल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविला आहे.

new delhi air pollution
औरंगाबादेत वायूप्रदूषण धोकादायक पातळीवर

PM2.5 आणि PM10 या प्रदूषकांमुळे श्वसनाचे आजार वाढले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे मार्गदर्शक तत्वे विचारात घेणे गरजेचे आहे. अनेक वैज्ञानिकांनी याबाबत चिंता देखील व्यक्त केली आहे. वायू प्रदूषण मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे यामध्ये म्हटले आहे. नव्या मार्गदर्शक तत्वानुसार, PM2.5 चे २५ मायक्रोग्राम हे सुरक्षित असल्याचे सुरुवातीला मानले जात होते. मात्र, आता जागतिक आरोग्य संघटनेने १५ मायक्रोग्रॅमच्यावर ते धोकादायक असल्याचे सांगितले आहे. सहा प्रदुषकांमध्ये PM10, ओझोन, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइड यांचा समावेश असून त्यांची पातळी २००५ च्या मापदंडापेक्षा कमी करण्यात आली आहे.

नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये पुढील अनेक वर्षांसाठी भारत हा प्रदूषित झोन मानला जाईल, असे म्हटले आहे. मात्र, यामध्ये भारत हा एकटाच देश नसून ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या अशा भागात राहते, ज्याचे २००५ च्या प्रदूषण मानकांचे पालन केले जात नाही. परंतु, दक्षिण आशिया आणि विशेषत: भारत अजूनही जगातील सर्वात प्रदूषित क्षेत्रांपैकी एक आहे, प्रदूषणाची पातळी शिफारस केलेल्या पातळीपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. गेल्या २०२० मध्ये दिल्लीतील PM2.5 ची पातळी ही शिफारस केलेल्या मानकापेक्षा १७ पटीने जास्त आहे, तर मुंबईमध्ये आठ पटीने जास्त असून कोलकात नऊ पटीने, तर चेन्नईमध्ये पाचपटीने जास्त आहे. भारताच्या 95 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आधीच अशा भागात राहत होती जिथे डब्ल्यूएचओच्या 2005 च्या मानकांपेक्षा प्रदूषणाची पातळी जास्त होती. भारतात गेल्या २००९ मध्ये हवा गुणवत्तेच्या मानकांमध्ये सुधारणा करण्यात आली होती. आता सध्या यावर काम सुरू असून पुढील वर्षी ते जाहीर करतील, असे सांगितले जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षा भारताचे धोरण थोडेसे उदार दिसून येते. कारण PM2.5 साठी जागतिक आरोग्य संघटनेने २५ मायक्रोग्राम ही जास्तीत जास्त पातळी घोषित केली होती, तर भारतीय नियमानुसार ती ६० मायक्रोग्राम आहे. मात्र, अजूनही भारत हे उद्दीष्ट साध्य करू शकला नाही. गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार त्यावर काम करत असून २०२४ पर्यंत वायू गुणवत्तेत सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. WHO चे नियम कोणत्याही देशाला बंधनकारक नाहीत. वैज्ञानिक अभ्यासाद्वारे मूल्यांकन केल्यानुसार, हे केवळ मानवी आरोग्यासाठी सुरक्षित मानले नियम आहेत. परंतु, वायूप्रदूष हे पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाची प्रतिमा मलिन करत असते. त्यामुळे विदेशी पर्यटकांचा ओढा कमी होण्याचा धोका असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com