अल कायदाचा मास्टरमाइंड मोहसिन अलमिसरीचा अफगाणिस्तामध्ये खात्मा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 October 2020

यापूर्वी अफगाणिस्तान आणि अमेरिकन सैन्य दलाच्या संयुक्त मोहिमेत कुख्यात दहशतवादी आसिम उमरला मारण्यात आले होते. 

अंडार (अफगाणिस्तान)- दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरु केलेल्या अफगाणिस्तानच्या लष्कराला मोठे यश मिळाले आहे. एका मोठ्या ऑपरेशनमध्ये अल कायदाचा मास्टरमाइंड मोहसिन अलमिसरी अंडार जिल्ह्यात मारला गेल्याचे राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयने (एनडीएस) सांगितले. 'टोलो न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार अलमिसरी भारतीय उपखंडासाठी दहशतवादी समूहाचा प्रमूख सदस्य म्हणून आपल्या दहशतवादी कृत्याची अंमलबजावणी करायचा.

अलमिसरीचा अटकेदरम्यान मृत्यू झाल्याचे यापूर्वी एनडीएसने म्हटले होते. नंतर अफगाणिस्तानच्या गुप्तचर आणि सुरक्षा दलाने गजनी प्रांतातील अंडार जिल्ह्यात अफगाण सैन्याने केलेल्या ऑपरेशनमध्ये अलमिसरीचा खात्मा करण्यात आल्याचे सांगितले. 

हेही वाचा- बिहारला महागठबंधन विजयी होईल; काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा

यापूर्वी 2019 मध्ये दहशतवाद्यांविरोधातील अभियानाला मोठे यश मिळाले होते. त्यावेळी अफगाणिस्तान आणि अमेरिकन सैन्य दलाच्या संयुक्त मोहिमेत कुख्यात दहशतवादी आसिम उमरला मारण्यात आले होते. 

हेही वाचा- Bihar Election: प्रचाराला निघालेल्या उमेदवाराची हत्या, जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचाही मृत्यू

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये तालिबान, आयएस आणि अलकायदाच्या हल्ल्यामुळे अनेक जणांचा नाहक बळी गेला आहे. युद्धग्रस्त देश असलेल्या अफगाणिस्तानमध्ये नुकताच झालेल्या हिंसाचारात 180 नागरिक मारले गेले तर 375 जण जखमी झाले होते. शनिवारी काबूल येथे इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी हल्ल्यात किमान 30 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: al qaeda mastermind mohsen almisri killed in afghan forces operation