
सहा महिलांच्या क्रूने आज अंतराळात झेप घेतली. फक्त महिलांच्या या क्रूने १४ मिनिटे अंतराळ प्रवास करून इतिहास घडवला. याआधी फक्त महिलांचा समावेश असलेल्या क्रूने ६२ वर्षांपूर्वी १९६३ मध्ये अशी कामगिरी केली होती. ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड सबऑर्बिटलने पॉप सिंगर केटी पेरी, जेफ बेजोस यांची पार्टनर लॉरेन सांचेज यांच्यासह ६ महिलांना घेऊन उड्डाण केले होते.