
इराणसोबत कच्चं तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचं डील केल्यानंतर अमेरिकेनं भाराताच्या चार कंपन्यांवर बंदी घातलीय. इराणविरोधात दबाव वाढल्यानं ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांतर्गत हा निर्णय घेण्यात आलाय. अमेरिकेच्या फॉरेन एसेट्स कंट्रोल डिपार्टमेंटनं हा निर्णय घेतलाय. या अंतर्गत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने अनेक देशांमधील ३० लोक आणि ४ भारतीय कंपन्यांवर बंदी घातलीय. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ भारतीय कंपन्यांवर बंदी घातली असून त्यात नवी मुंबईतील फ्लक्स मारटाइम एलएलपी कंपनीचा समावेश आहे. याशिवाय एनसीआरमधून चालवण्यात येणारी बीएसएम मरीन आणि ऑस्टिनशिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचाही समावेश आहे. तंजावरमधील कॉसमॉस लायन्सवरही अमेरिकेनं बंदी घातलीय.