भारत-पाकिस्तान सीमेपासून लांब राहा, अमेरिकेने आपल्या नागरिकांना दिला इशारा

भारतातील आपल्या नागरिकांसाठी अमेरिकेने मार्गदर्शक सूचना केल्या जारी
india-pakistan border
india-pakistan border

पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या राजकीय संकटादरम्यान नुकतेच अमेरिकेने भारतातील आपल्या नागरिकांसाठी प्रवासा करिता मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात भारत-पाकिस्तान सीमेच्या १० किमीपासून लांब राहण्यास सांगितले आहे. यामागे भारत-पाकिस्तान दरम्यान सैन्य कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका नवीन सूचनांमध्ये म्हटले आहे, की गुन्हेगारी आणि दहशतवादामुळे भारताबाबत सतर्कता वाढवण्यात आली आहे. भारतातील प्रवासाचा जोखीमस्तर कमी करुन स्तर-३ हून स्तर -२ वर आणले गेले आहे. यापूर्वी रोग नियंत्रण केंद्रानेही (सीडीसी) भारतात कोविड - १९ चे रुग्ण कमी झाल्याने स्तर -१ ट्रॅव्हल हेल्थ नोटीस जारी केले होते. यावरुन अमेरिकेला वाटते की भारतातील स्थिती आता सामान्य होत चालली आहे.

india-pakistan border
युक्रेनने केला रशियावर हवाई हल्ला, दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच...!

जम्मू-काश्मीर आणि भारत तथा पाकिस्तान सीमेबाबतचा अमेरिकेचा पूर्वीचा दृष्टीकोन कायम आहे. जेथे आपल्या नागरिकांना हा देश यात्रा न करण्याचा सल्ला देत आहे. मार्गदर्शकात म्हटले आहे, की केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले आणि हिंसक निदर्शने होण्याची शक्यता आहे. या केंद्रशासित प्रदेशाचा प्रवास करण्याचे टाळा.

india-pakistan border
मुलगा गतिमंद..आईचं सर्व काळजी घ्यायची, पण तिने स्वतःला कायमचं संपवलं

किरकोळ हिंसा विशेषतः भारत-पाकिस्तानच्या नियंत्रण रेषा आणि काश्मीर खोऱ्यातील पर्यटनस्थळे जसे की श्रीनगर, गुलमर्ग आणि पहलगाममध्ये होते. भारत सरकारही परदेशी पर्यटकांना नियंत्रण रेषेजवळच्या काही भागांमध्ये जाण्यास प्रतिबंध करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com