अमेरिका पुन्हा जागतिक आरोग्य संघटनेत सामील होणार; पण...

यूएनआय
सोमवार, 1 जून 2020

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेसोबतचे(WHO) सर्व संबंध तोडत असल्याची घोषणा केली होती. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातची बाहुली असल्याचं म्हणत त्यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र, अमेरिका पुन्हा जागतिक आरोग्य संघटनेत सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेसोबतचे(WHO) सर्व संबंध तोडत असल्याची घोषणा केली होती. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातची बाहुली असल्याचं म्हणत त्यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र, अमेरिका पुन्हा जागतिक आरोग्य संघटनेत सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

डब्ल्यूएचओ जर भ्रष्टाचार आणि चीनची बाजू घेणे बंद करणार असेल तर अमिरेका पुन्हा संबंध प्रस्थापित करण्याबाबत विचार करु शकते, असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी म्हटलं आहे.

चीनची युद्धाची तयारी? लडाखच्या सीमेवर काय करतयं चीनी सैन्य?

डब्ल्यूएचओमध्ये सुधारणा व्हावी असं ट्रम्प यांना वाटते. त्यामुळे संघटना आपल्यात सुधारणा करण्यास तयार असेल आणि चीनची तळी उचलून धरणार नसेल तर आम्ही गंभीरतेने पुन्हा सामील होण्याचा विचार करु, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे अमेरिका पुन्हा एकदा डब्ल्यूएचओसोबत जोडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे तीनच दिवसांपूर्वी शुक्रवारी (29 मे) डोनाल्ड्र ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओ सोबतचे संबंध तोडले होते. 

अमेरिकेत दुकानाची लूट, गाड्यांची तोडफोड, आगी लावणे चालूच

डब्ल्यूएचओ ही चीन केंद्रीत संघटना आहे. कोरोना विषाणू महामारीविरोधात लढण्यात संघटना पूर्णपणे अपयशी ठरली आहे. चीन संघटनेला 40 दशलक्ष डॉलरची मदत करते, तर अमेरिका 400 दशलक्ष डॉलरची मदत करते. असे असून सुद्धा डब्ल्यूएचओवर चीनचे वर्चस्व आहे. आम्ही इशारा देऊनही संघटना सुधरायला तयार नाही. त्यामुळे आम्ही डब्ल्यूएचओसोबतचे संबध तोडत आहोत. तसेच जो पैसा डब्ल्यूएचओला दिला जायचा तो पैसा आता अन्य आरोग्य संघटनेला दिला जाईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं. 

आता 'जी-७' चे होणार 'जी-१० किंवा ११'

जागतिक आरोग्य संघटना सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रसार रोखण्यात अपयशी ठरली. तसेच चीनने कोरोना विषाणूच्या प्रसाराची बातमी लपवून ठेवली. अशावेळी संघटनेने चीनला पाठीशी घालण्याचे काम केले, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america said about rejoin who but put a condition