चीनची युद्धाची तयारी? लडाखच्या सीमेवर काय करतयं चीनी सैन्य?

India-and-China
India-and-China

नवी दिल्ली- भारत आणि चीनमध्ये तणाव वाढत असल्याचं दिसत आहे. कारण चीनने पूर्व लडाखच्या विवादित भागात शस्त्र आणि आवश्यक सामानाची जुळवाजुळव सुरु केली आहे. यात तोफा आणि इतर लढाऊ वाहनांचा समावेश आहे. भारत आणि चीनमध्ये गेल्या 25 दिवसांपासून तणाव आहे. चीनला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही सीमा भागात तयारी सुरु केली आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमधील परिस्थिती चिघळ्याची चिन्हं आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर ( line of actual control) आपल्या तळांवर तोफा, रणगाडे आणि अन्य सैन्य उपकरण वाढवत आहे. भारतानेही चीनला जशासतसे उत्तर देण्यासाठी तोफा आणि अन्य सैन्य उपकरणाची सीमाभागावर आवक वाढवली आहे. जोपर्यंत चीनी सैन्य पैंगोंग त्सो, गालवान व्हॅली आणि अन्य भागातून मागे जात नाही तोपर्यंत भारतीय सैन्य त्याठिकाणी तैनात असणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं आहे. 

मे महिन्याच्या सुरुवातीला चीनी सैन्याने भारतीय सीमा पार करुन घुसखोरी केली. तेव्हापासून पैंगोग त्सो आणि गालवान व्हॅलीमध्ये चीनी सैन्य तंबू ठोकून आहे. भारतीय सैन्याने चीनी जवानांच्या या अतिक्रमणाला विरोध केला होता. तसेच तात्काळ तेथून वापस जाण्याची ताकीद दिली होती. चीनी सैनिकांनी डेमचोक आणि दौलतबैग ओल्डी भागातही घुसखोरी केली होती. या पार्श्वभूमीवर भारत-चीन सैनिकांमध्ये 8 मे रोजी हातापायी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. 

अमेरिकेत दुकानाची लूट, गाड्यांची तोडफोड, आगी लावणे चालूच
 
चीनने पैंगोग त्सो आणि गालवान व्हॅलीमध्ये अंदाजे 2500 सैनिक तैनात केल्याचं सांगितलं जात आहे. हा अधिकृत आकडा  नसला तरी उपग्रहातून घेतलेल्या फोटोंनुसार सीमा भागात चीनच्या हालचाली कमालीच्या वाढल्या आहेत. तसेच पैंगोंग त्सो भागापासून जवळजवळ 180 किलोमीटर अंतरावर चीन एक सैन्य हवाईअड्डा बनवत आहे. 

भारत-चीन या देशांमध्ये अशाप्रकारचे वातावरण यापूर्वीही निर्माण झाले आहे. भारतावर दबाव आणण्याची चीनची खेळी जुनी आहे. मात्र, भारतीय सैन्य आपल्या जागेवर ठाम असून कोणत्याही तडजोडीस आम्ही तयार नाही, असं सैन्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून चीनसोबत निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी आम्ही राजकीय पातळीवर चर्चा करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारताने सीमा भागात रस्ते निर्माणाचं काम मोठ्या प्रमाणात सुरु केले आहे. त्यामुळे चीन बिथरला असून भारताविरुद्ध दबावतंत्राला अवलंब करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com