
न्यूयॉर्क - जगातील सात आघाडीच्या आर्थिक महासत्ता असणाऱ्या देशांची संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ''जी-७'' या संघटनेची पुनर्रचना करण्याचा घाट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घातला आहे. भविष्यात या संघटनेचे स्वरूप हे ''जी-१०'' किंवा ''जी-११'' असे असू शकते. यामध्ये भारत, ऑस्ट्रलिया, दक्षिण कोरिया आणि रशिया या देशांचाही समावेश व्हावा म्हणून ट्रम्प आग्रही आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या संघटनेची विद्यमान रचना ही कालबाह्य झाली असून त्यात बदल करणे आवश्यक असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. कॅम्प डेव्हिड येथे याच महिन्यात होऊ घातलेले या संघटनेचे संमेलन रद्द करताना ट्रम्प यांनी संघटनात्मक फेरमांडणीचा संकल्प बोलून दाखविला. चालू आठवड्यातच ट्रम्प यांनी संमेलनाच्या अनुषंगाने सदस्य देशांची एक बैठक घेतली होती त्यात त्यांनी कोरोनाच्या संसर्गामुळे व्हर्च्युअल संमेलन घेण्याचा प्रस्ताव मांडत या संमेलनाचे यजमानपद स्वतःकडे घेतले होते. यावर भडकलेल्या जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी बैठकीतून बाहेर पडणे पसंद केले होते. सध्या जगभर कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले असल्याने अन्य सदस्य देशांनी या संमेलनाला विरोध केला आहे.
ट्रम्प नाराज
१९७३ मध्ये या संघटनेचे स्वरूप ''जी-४'' असे होते पण नंतर कालानुरूप विस्तार होत गेला. येत्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेचे संमेलन होणार असून त्याचवेळी संघटनेचेही संमेलन होण्याची शक्यता वआहे. आता देखील या संघटनेचे संमेलन रद्द करताना ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ' या संघटनेचे संमेलन मी तात्पुरते पुढे ढकलत आहे, सध्या ही संघटना सगळ्या जगाचे प्रतिनिधित्व करते असे मला मुळीच वाटत नाही. काही देशांचा हा समूह हा कालबाह्य झाला आहे.'
रशियाला संधी
नव्या प्रारूपात आता रशियालाहील स्थान मिळू शकते. रशिया या आधी सदस्य होता. क्रिमीयावर आक्रमण केल्यानंतर २०१४ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियाची संघटनेतून हकालपट्टी केली होती. ट्रम्प मात्र रशियाला पुन्हा स्थान मिळावे म्हणून आग्रही आहेत.
विद्यमान सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.