Corona: भारताला एक चूक महागात पडली; अमेरिकेच्या मुख्य साथरोगतज्ज्ञांचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona deaths

Corona: भारताच्या एका चुकीने घात केला; अमेरिकेच्या मुख्य साथरोगतज्ज्ञांचा दावा

वॉशिंग्टन- कोरोनाच्या दुसरी लाट भारतासाठी सर्वाधिक धोकादायक ठरली आहे. कोरोनारुग्ण व मृतांची संख्याही सातत्याने वाढत आहे. भारतातील कोरोनाच्‍या या उद्रेकाचे कारण म्हणजे साथ संपुष्टात आल्याचा भारताचा चुकीचा अंदाज आणि सर्व व्यवहार वेळेपूर्वी सुरू करणे, हे असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि साथरोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. (America top infectious disease expert Dr Anthony Fauci said India opened up prematurely corona)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर आणि लशींचा तुटवडा, आरोग्य सेवकांची कमतरता जाणवत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दुसऱ्या लाटेत भारतात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा पहिला टप्पा म्हणजे वास्तवात एक लाट होती. पण त्यानंतर कोरोनाची साथ संपल्याचे चुकीचे अनुमान काढून भारताने सर्व निर्बंध वेळेपूर्वी हटविण्यास सुरुवात केली. ही घाईमुळेच दुसऱ्या लाटेचे भयंकर परिणाम भारतात पाहायला मिळत आहेत, असे डॉ. फौसी यांनी कोरोना प्रतिसादावरील चर्चेदरम्यान सिनेटच्या आरोग्य, शिक्षण, कामगार आणि निवृत्तीवेतन समितीसमोर सांगितले.

हेही वाचा: भारताच्या मदतीसाठी अमेरिका बांधील - कमला हॅरिस

या चर्चासत्राच्या अध्यक्षा व सिनेटर पॅटी मुरे म्हणाल्या की, कोरोनामुळे भारतात निर्माण झालेली भयानक स्थितीमुळे एक दुःखदायक वास्तव समोर येत आहे, ते म्हणजे सर्व ठिकाणी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव जोपर्यंत आटोक्यात येत नाही, तोपर्यंत अमेरिका ही जागतिक साथ संपुष्टात आणू शकत नाही. ‘‘जागतिक आरोग्य संघटनेशी पुन्हा बांधिल राहून ज्यो बायडेन प्रशासन कोरोनाविरोधातील जागतिक लढ्याचे नेतृत्व करीत आहे आणि जागतिक लसीकरणाला निधी पुरवीत आहे. तसेच अन्‍य देशांना ४ जुलैपर्यंत ॲस्ट्राझेनेका लशीचे सहा कोटी डोस अन्य देशांना पुरविण्याची कटिबद्ध बायडेन सरकारने व्यक्त केली, याचा मला आनंद वाटत आहे,’’ असे मुरे यांनी सांगितले.

हेही वाचा: भारत कोरोनाच्या विळख्यात; अमेरिका, यूके आणि जर्मनीकडून मदत

अमेरिकेनेही काळजी घ्यावी

भारतावरून अमेरिकेलाही धडे मिळाले, असल्याचा सूर चर्चासत्रात उमटला. त्यानुसार डॉ. फौसी यांनी पुढील मुद्यांवर भर देण्याची सूचना केली.

- कोणतीही परिस्थिती कमी लेखू नये

- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणे

- जागतिक साथकाळात स्वतःच्या देशापलीकडे विचार करीत अन्य देशांना सहकार्य करावे

- अशा काळात विशेषतः जगभरातील लसीकरणासाठी प्रयत्न करणे

कोरोनाची सध्याची साथ आणि भविष्यातील अशा संकटाला योग्य पद्धतीने तोंड देण्यासाठी अमेरिकेतील सार्वजनिक आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्याची गरज भारतातील स्थितीमुळे अधोरेखित झाली आहे, असं सिनेटर पॅटी मुरे म्हणाले.

आपण आतापर्यंत अनेक रोगांवर नियंत्रण मिळविले असल्याने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत एक प्रकारची शिथिलता आली आहे. ती झटकून स्थानिक आरोग्य सेवेकडे सतत लक्ष देण्याची गरज आहे, असं साथरोगतज्ज्ञ डॉ. डॉ. अँथनी फौसी म्हणाले.

Web Title: America Top Infectious Disease Expert Dr Anthony Fauci Said India Opened Up Prematurely

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top