

अमेरिकन विमान कॅरेबियन किनारपट्टीवर कोसळून सात जणांचा मृत्यू झालाय. यात एका प्रसिद्ध संगीतकाराचाही सावेश आहे. तर दहा जणांना वाचवण्यात आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सोमवारी रात्री होंडुरास इथं ही दुर्घटना घडली. होंडुरासच्या रोआतान बेटावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच विमान समुद्रात कोसळलं. यात सात जण मृत्यूमुखी पडले तर दहा जणांना वाचवण्यात आलंय. प्रसिद्ध संगीतकार ऑरेलियो मार्टिनेस सुवाजो याचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला.