परदेशी महिला, 300 रुपयांचे दागिने अन् 6 कोटी; जयपूरची ही घटना वाचून, लावाल डोक्याला हात

US Woman: या दरम्यान तिने दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी इतर दुकानांमध्ये देखील पाठवले, तेथेही ही दागिने बनावट असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर चेरिशने या घटनेची माहिती अमेरिकन दूतावासाला दिली.
US WOman Duped For 6 Crores In Jaipur
US WOman Duped For 6 Crores In JaipurEsakal

जयपूरमध्ये अमेरिकन महिलेची 6 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. येथील एका ज्वेलरी शॉपमध्ये 300 रुपयांचे बनावट दागिने 6 कोटींना विकून एका अमेरिकन महिलेची फसवणूक करण्यात आली आहे.

जयपूर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. अमेरिकन दूतावासाच्या मदतीनेही तपास सुरू करण्यात आला आहे. ही घटना घडल्यापासून आरोपी दुकानदार आणि त्याचा मुलगा फरार आहेत. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेरीश ही अमेरिकन नागरिक असून तिने दोन वर्षांपूर्वी जयपूरमधील 'गोपालजी का रास्ता' येथील दुकानात 6 कोटी रुपये खर्च करून दागिने विकत घेतले होते. खरेदीच्या वेळी, विक्रेत्याने महिलेला दागिन्यांची शुद्धता दर्शवणारे हॉलमार्क प्रमाणपत्र देखील दिले होते.

त्यानंतर चेरीश परत यूएसला गेली आणि एका प्रदर्शनात दागिने प्रदर्शित केले, जिथे तिला ते बनावट असल्याचे आढळले. त्यानंतर, ती जयपूरला परतली आणि तिने रामा रेडियम या ज्वेलर्सच्या दुकानाला भेट दिली आणि बनावट दागिन्यांची तक्रार दुकान मालक गौरव सोनी यांच्याकडे केली.

US WOman Duped For 6 Crores In Jaipur
Israel-Hamas War: अखेर इस्राइल-हमास युद्ध थांबणार? संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिकेच्या प्रस्तावाला मिळाले समर्थन

या दरम्यान तिने दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी इतर दुकानांमध्ये देखील पाठवले, तेथेही ही दागिने बनावट असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर चेरिशने या घटनेची माहिती अमेरिकन दूतावासाला दिली.

यानंतर 18 मे रोजी ज्वेलर्स राजेंद्र सोनी आणि त्यांचा मुलगा गौरव सोनी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला होता.

US WOman Duped For 6 Crores In Jaipur
Pakistan PM : मोदीवर प्रेम नाही तर नाईलाज...; शाहबाज शरीफ यांच्या शुभेच्छांच्या मेसेजवर पाकच्या संरक्षण मंत्र्याचं स्पष्टीकरण

अतिरिक्त पोलीस उपायुक्त बजरंग सिंग शेखावत यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी एका विदेशी महिलेला सोन्याचे पॉलिश केलेले चांदीचे दागिने 6 कोटी रुपयांना विकले होते.

आरोपींनी बनावट प्रमाणपत्रही तयार केले आणि विकलेले दागिने खरे असल्याचे महिलेला पटवून दिले. आरोपींना पकडण्यासाठी विशेष पोलिस पथक तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com