esakal | कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अमेरिकेत संशोधन, भारतीय संशोधकाच्या हातात धुरा

बोलून बातमी शोधा

corona v
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अमेरिकेत संशोधन, भारतीय संशोधकाच्या हातात धुरा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-जितेंद्र विसपुते

औरंगाबाद : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाअंतर्गत असलेल्या बायोसेप्टी लेव्हल ३ या प्रकारच्या प्रयोगशाळेने सुसज्ज असलेल्या ग्लॅडस्टोन या संशोधन संस्थेमध्ये संशोधन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे या संशोधनाची धुरा अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोत स्थायिक असलेले भारतीय संशोधक डॉ. राहुल सूर्यवंशी यांच्या खांद्यावर सोपविण्यात आलेली आहे. मागील वर्षापासून कोरोना विषाणुने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला असून लाखो नागरिकांचे बळी या महामारीत गेले आहेत. मानवी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या विविध लसींचा पर्याय समोर आलेला आहे. मात्र कोरोनाचे शरीरात गेलेले विषाणूच संपविणारा उपचार समोर आलेला नाही. हे शिवधनुष्य अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने पेलले आहे. या विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या प्रख्यात ग्लॅडस्टोन या संशोधन संस्थेत याबद्दल संशोधन सुरू झालेले आहे. या संशोधन संस्थेच्या २५ प्रयोगशाळा असून ३५० शास्त्रज्ञ येथे कार्यरत आहेत.

हेही वाचा: सासऱ्याने गजाने मारुन जावयाचे नाकच केले फ्रॅक्चर

भविष्यात उद्भवणारे आजार थोपवण्यासाठी जास्तीत-जास्त माहिती समाजापर्यंत पोहोचविणे हे आमचे ध्येय असल्याचे ग्लॅडस्टोनच्या व्हायरॉलॉजी लॅब संचालिका डॉ.मेलेनी ऑट यांचे म्हणणे आहे.या संस्थेत डॉ.सूर्यवंशी संशोधक शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत असून ते कोविड १९ चा विषाणू मानवी शरीरात कसा पसरतो? कुठे आणि कसा हल्ला चढवतो? त्यामुळे शरीरावर काय परिणाम होतात? याचा शोध ते घेत आहेत. यासाठी होणाऱ्या सर्व परिणामकारक तपासण्या उंदरावर केल्या जात आहेत. कोरोनाचा विषाणू यासाठी उंदराच्या शरीरात सोडला जातो. यानंतर त्याचे परिणाम नोंद केले जातात. याच ठिकाणी मानवी शरीरात असलेले कोरोनाचे विषाणूच नष्ट करण्यासाठी संशोधन सुरू आहे. आता कुठे कोरोनाबद्दल माहिती समोर आलेली आहे. यामुळे संशोधन किती दिवस चालेल आणि अंतिम परिणाम कधी हाती येतील ते सांगता येत नाही. मात्र निश्चितच सकारात्मक परिणाम जगासमोर आणू, असे डॉ.सूर्यवंशी यांनी 'सकाळ'ला सांगितले.

हेही वाचा: वाळूजजवळ तरुण धक्कादायक अवस्थेत आढळला, क्षुल्लक कारण बेतले जीवावर

प्राण्यांवर चाचणी करणारे एकमेव तज्ज्ञ

चाचण्यांसाठी लागणारे उंदीर याच प्रयोगशाळेत वाढविले जातात. त्यांचे प्रजननदेखील घडवून आणले जाते. ही सर्व जबाबदारी डॉ.सूर्यवंशी यांच्याकडे आहे. प्राण्यांवर चाचणी करणारे या प्रयोगशाळेतील ते एकमेव तज्ज्ञ आहेत.

img

आम्हाला जसे कोरोनाच्या प्रसाराबद्दल कळलं तस आम्ही आमच्या जगभरातील रिसर्च पार्टनरसोबत संशोधन हाती घेतले. भारताच्या परिस्थितीबद्दल आम्हाला चिंता आहे. डॉ. राहुल आमच्यासोबत काम करताहेत हे आमचे भाग्य. कोविडसह इतर व्हायरसबद्दल असणाऱ्या आमच्या ज्ञानाचा वापर करुन जागतिक महामारी थांबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

- डॉ.मेलेनी ऑट, संचालिका, व्हायरॉलॉजी लॅब, ग्लॅडस्टोन

कोरोना विषाणूची मानवी शरीरातील वाढ रोखण्यासाठी आवश्यक मूलभूत संशोधन ग्लॅडस्टोन या कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या लॅबमध्ये सुरू आहे. संशोधक आणि शास्त्रज्ञांपुढे कोरोनाचे मोठे आव्हान आहे. प्राथमिक टप्प्यात संशोधन आहे. मी यात सहभागी आहे याचा आनंद आहे.

- डॉ.राहुल सूर्यवंशी, संशोधक शास्त्रज्ञ, ग्लॅडस्टोन