Appleचे कर्मचारी जॉब सोडण्याचा विचारात, कारण वाचाल तर आश्चर्य वाटेल |Apple is asking employees to return to offices | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple is asking employees to return to offices

Appleचे कर्मचारी जॉब सोडण्याचा विचारात, कारण वाचाल तर आश्चर्य वाटेल

कोरोनाच्या दोन वर्षानंतरच्या महामारीनंतर जग हळूहळू सावरत आहे. अशात Apple आणि Google सारख्या दिग्गज कंपन्या कर्मचाऱ्यांना ऑफीसमध्ये काम करण्याकरीता परत येण्यास सांगत आहेत. कोराना काळात सर्वच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची सुरक्षितता समोर ठेऊन वर्क फ्रॉम होमला प्रथम प्राधान्य दिले होते. मात्र आता कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असल्याने कर्मचार्‍यांना परत कामावर बोलवले जात आहे. Apple कंपनीने सुद्धा हा निर्णय घेतल्याने कर्मचारी सध्या नाराज आहे. (Apple workers reportedly are against the company’s return to office policy.)

Appleचे जवळपास 76 टक्के कर्मचारी कंपनीच्या कार्यालयात परतण्याच्या निर्णयाविरोधात आहेत, या निर्णयाद्वारे त्यांना आठवड्यातून एकदा कार्यालयात येणे आवश्यक आहे. 23 मे पासून अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात राहण्यास सांगितले आहे. यामुळे कर्मचारी आणखी निराश होण्याची शक्यता आहे.

एका सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की Appleचे बहुतांश कर्मचारी ऑफिसमध्ये परत बोलवण्याच्या निर्णयामुळे नाराज आहेत आणि त्यामुळे नोकरी सोडण्यास ते प्राधान्य देत आहेत.

२०२० मध्ये कोराना आल्याच्या सुरुवातीपासून Appleपलचे बहुतेक कर्मचारी दोन वर्षांहून अधिक काळ संपूर्णपणे घरून काम करत होते. बहुतेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांना नियमित आता ऑफीसला यायला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तर अन्य काही दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करणार आहे.

सोबतच Googleही त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफीसमध्ये परत बोलावत आहे आणि मोफत इलेक्ट्रिक स्कूटर देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न गुगल कडून सुरु आहे.