24 तासांच्या आतच अमेरिकेनं केलेली मध्यस्थी अयशस्वी; आर्मेनिया-अझरबैजान यांचात पुन्हा युद्ध

azarbaijan armenia war
azarbaijan armenia war

येरेवान - अमेरिकेच्या मध्यस्थीने आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील युद्ध रविवारी थांबलं होतं. पण दोन्ही देशांमधील शांततेचा हा करार संपुष्टात येताना दिसत आहे. सोमवारी पुन्हा एकदा आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात संघर्ष झाला. दोन्ही देशांनी एकमेकांवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. नागोरनो काराबाख भागावरून दोन्ही देश गेल्या महिन्याभरापासून लढत आहेत. गेल्या दोन आठवड्यात तीनवेळा करार झाला होता. याआधी रशियाने मध्यस्थी करत दोनवेळा शांततेसाठी करार केले पण ते प्रयत्न अयशस्वी ठरले. 

अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर काही तासांनी अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं की, आर्मेनियाच्या लष्कराने तेर्तार आणि लाचिन भागात गोळीबार केला. दुसरीकडे नागोर्नो काराबाखने हे वृत्त फेटाळून लावले असून अझरबैजानच्या लष्कराने आर्मेनियावर मिसाइल हल्ला केल्याचं सांगितलं. आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं की, अझरबैजानने स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

नागोर्नो काराबाख अधिकृतपणे अझरबैजानचा भाग आहे मात्र या ठिकाणावर आर्मेनियाने ताबा मिळवला आहे. या भागात आर्मेनियन जास्त आहेत. आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील संघर्ष 27 सप्टेंबरला सुरु झाला होता. दोन्ही देशांमधील संघर्ष थांबण्यासाठी अनेक प्रयत्न होऊनही युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

जगातील अनेक मोठे देश हा संघर्ष रोखण्यासाठी धडपडत आहेत. तुर्कस्थान अझरबैजानला पाठिंबा देत असून आर्मेनियाला रशियाची साथ आहे. त्यामुळे या दोन देशांमधील संघर्षाचा परिणाम इतर देशांच्या संबंधावर होणार आहे. जर युद्ध झाले तर यामध्ये रशिया, तुर्कस्थानसुद्धा उतरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी झालेल्या चर्चेत शस्त्रसंधीवर एकमत झाल्याचं सांगितलं होतं. हा संघर्ष कमी कऱण्यासाठी मिन्स्क ग्रुपच्या प्रतिनिधींनी यामध्ये भाग घेतला होता. यामध्ये फ्रान्स, रशिया, अमेरिका यांचा समावेश आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर म्हटलं की, आर्मेनियाचे पंतप्रधान निकोलस पशिनान आणि अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांचे संघर्ष थांबण्यासाठी एकमत झाल्याबद्दल अभिनंदन. यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचवता येतील. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com