युक्रेनच्या महिला सेक्सी अन्...; ब्राझिलच्या नेत्याचं लाजीरवाणं विधान I Ukrainian Women | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ukrainian Women

युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यांमुळं लाखो लोक निर्वासित झाले आहेत.

युक्रेनच्या महिला सेक्सी अन्...; ब्राझिलच्या नेत्याचं लाजीरवाणं विधान

ब्राझिलिया (Brasilia) : युक्रेनमध्ये रशियन (Russia Ukraine War) हल्ल्यांमुळं लाखो लोक निर्वासित झाले आहेत. या लोकांना युरोपातील अनेक देशांमध्ये आश्रय घ्यावा लागतोय. कडाक्याच्या थंडीत सर्वसामान्यांना उघड्यावरच रात्र काढावी लागत आहे, अशी स्थिती आहे. मात्र, असं असताना ब्राझीलच्या (Brazil) एका उजव्या विचारसरणीच्या नेत्यानं अतिशय लाजिरवाणं विधान केलंय. साओ पाउलोचे संसदपटू आर्थर डो वॅल (Arthur Do Val) यांनी युक्रेनियन महिलांना (Ukrainian Women) 'स्वस्त' आणि अतिशय 'सेक्सी' असल्याचं म्हंटलंय.

आर्थर यांचं हे वक्तव्य व्हायरल झाल्यामुळं ब्राझीलच्या मीडियामध्ये खळबळ उडालीय. लाखो युक्रेनियन नागरिकांच्या बेघरतेवर असं विधान केल्यानं आर्थर यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आर्थर यांनी आपल्या वादग्रस्त विधानात म्हटलंय की, मी युक्रेन आणि स्लोव्हाकियाची सीमा पायी चालत जावून पूर्ण केलीय. परंतु, सुंदर मुलींच्या बाबतीत मला इथं वेगळं चित्र पहायला मिळालं. गार्डियनच्या रिपोर्टनुसार, युक्रेनमध्ये मुलींची लांबलचक रांग इतकी सुंदर होती की, ब्राझील नाईट क्लबच्या बाहेर उभ्या असलेल्या मुलीसारखी वाटतं होती, असंही आर्थर यांनी म्हंटलंय. आर्थर यांनी युक्रेन आणि स्लोव्हाकियाच्या सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांनाही शिवीगाळ केल्याचं वृत्त ब्राझिलियन मीडियानं दिलंय.

हेही वाचा: युध्दाच्या गडद संकटात युक्रेनमध्ये तब्बल 4000 जोडप्यांची लग्नं

तर दुसरीकडं ब्राझीलमधील युक्रेनच्या माजी राजदूताच्या पत्नीनं आर्थर यांच्या विधानावर जोरदार टीका केलीय. गरीब विचारसरणी असलेल्यांचा आदर करा, असं त्यांनी म्हंटलंय. चौफेर टीकेनंतर आर्थर यांनी आपली बाजू मांडलीय. युक्रेनमधील लाखो लोक आपला जीव वाचवण्यासाठी पोलंड आणि रोमानियासारख्या देशांत जात आहेत. त्यांच्यामध्ये मोठ्या संख्येनं महिला आहेत, त्यांना सेक्स स्लेव्ह बनण्याचा धोका आहे, म्हणून मी तसं विधान केलं असल्याचं आर्थर यांनी सांगितलंय.

Web Title: Arthur Do Val Controversial Statement About Ukrainian Women

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top