World's largest bottle of Scotch whisky Auction
World's largest bottle of Scotch whisky AuctionSakal

जगातील सर्वात मोठ्या व्हिस्कीचा होणार लिलाव; जाणून घ्या खासियत

जगातील सर्वात मोठ्या व्हिस्कीच्या बाटलीचा यूकेमध्ये २५ मे रोजी लिलाव होणार आहे.

World's largest bottle of Scotch Whisky: जगातील सर्वात मोठ्या व्हिस्कीच्या बाटलीचा यूकेमध्ये २५ मे रोजी लिलाव होणार आहे. ही बाटली आतापर्यंत विकल्या गेलेल्या व्हिस्कीच्या सर्वात महागड्या बाटलीचा जागतिक विक्रम मोडू शकते. यापूर्वी एका 1.9 दशलक्ष डॉलर्स होते.

32 वर्षीय मॅकॅलनची (Macallan) तब्बल 311 लिटर स्कॉच व्हिस्कीचा या महिन्यात लिलाव होणार आहे. द इंट्रेपिड (The Intrepid) नावाने ओळखली जाणारी ही बाटली 5 फूट 11 इंच उंच आहे. तिचा लिलाव एडिनबर्गमधील लिओन आणि टर्नबुल ही संस्था करेल. या बाटलीत 444 मानक बाटल्या समतुल्य असू शकतात, त्याचा लिलाव 25 मे रोजी होणार आहे.

World's largest bottle of Scotch whisky Auction
बियर शॉपीमध्येच सर्रास देशी, रम, व्हिस्की, व्होडका

WellsOnline च्या मते, अशी अपेक्षा आहे की ही बाटली आतापर्यंत विकल्या गेलेल्या व्हिस्कीच्या सर्वात महागड्या बाटलीचा जागतिक विक्रम मोडू शकते. यापूर्वी एका 1.9 दशलक्ष डॉलर्स होते. हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने अधिकृतपणे प्रमाणित केले आहे. या लिलावात 1.3 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किंमत मिळू शकते. मिळालेल्या या रकमेपैकी 25 टक्के रक्कम मेरी क्युरी धर्मादाय संस्थेला दान केली जाईल.

ही व्हिस्की 32 वर्षांपूर्वी मॅकलनच्या स्पेसाइड वेअरहाऊसमध्ये दोन डब्यांमध्ये बनवण्यात आली होती. त्यानंतर डंकन टेलर स्कॉच व्हिस्की या प्रसिद्ध व्हिस्कीची बाटली बनवणाऱ्या कंपनीने गेल्या वर्षी तिची बाटली बनवली होती. लिलावाच्या तपशिलानुसार, ही खास पद्धतीने बनवली आहे. तिच्यामध्ये पांढरी मिरी आणि फ्रेंच सफरचंद टार्ट आफ्टरटेस्टसह गोड एकात्मिक चव आहे. वाईन जितकी जुनी तितकी ती चांगली मानली जाते, त्यामुळे या 32 वर्ष जुन्या वाईनला किती खरेदीदार बोली लावतात हे पाहावे लागेल."

World's largest bottle of Scotch whisky Auction
जगात सर्वाधिक विकले जाणारे 10 व्हिस्की ब्रॅंड; पैकी 7 आहेत भारतीय

दरम्यान, यासाठी काही खास बाटल्यांचे संचही तयार करण्यात आल्याचे वृत्त वेल्स ऑनलाइनने दिले आहे. यामध्ये 12 बाटल्यांचा समावेश आहे, प्रत्येक बाटलीमध्ये 32 वर्षांची मॅकॅलन व्हिस्की भरली होती. या बाटल्यांचा वापर रेकॉर्डब्रेक बाटली भरण्यासाठी केला गेला होता. प्रत्येक बाटली ही मुख्य बाटलीच्या डिझाईनची प्रतिकृती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com