

Balochistan Blast Targets Security Convoy on N-25 Highway
esakal
पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातून मोठी बातमी समोर आली आहे. लासबेला जिल्ह्यातील N-25 राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा दलांच्या ताफ्याला लक्ष्य करून मोठा स्फोट घडवून आणण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात 23 हून अधिक जवानांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, अनेक जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मृतांचा आकडा अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेला नाही.