

Summary
बांगलादेशात कट्टरपंथी गटांनी भारतविरोधी रॅली काढल्या आहेत.
या रॅलींमध्ये इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
कट्टरपंथी संघटनांनी इस्कॉनला "भारतीय एजंट" आणि "हिंदुत्ववादी संस्था" म्हटले. आहे.
बांगलादेशातील कट्टरपंथी गटांनी देशातील संसदीय निवडणुकांपूर्वी भारतविरोधी वक्तव्ये आणि अल्पसंख्याकांवर हल्ले वाढवले आहेत.कट्टरपंथियांनी इस्कॉनवर बंदी घालण्याची आणि त्याला भारतीय एजंट म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. जमात-ए-इस्लामी, हिजबुत तहरीर आणि हेफाजत-ए-इस्लामशी संबंधित विद्यार्थी संघटनांनी शुक्रवारी बांगलादेशभर भारतविरोधी रॅली काढल्या, इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी केली. फेब्रुवारी २०२६ मध्ये निवडणुका होणार आहेत, परंतु अवामी लीगवरील बंदीमुळे राजकीय हालचाली वाढल्या आहेत.