esakal | 'पाकने केलेला नरसंहार अन् लाखो महिलांवरील बलात्कार देश विसरलेला नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

bangladesh, pakistan

मेनन म्हणाले की,  1971 च्या मुक्ती युद्धावेळी पाकिस्तानने जो  नरसंहार केला त्याबदद्दल त्यांनी आतापर्यंत कधीही माफी मागितलेली नाही. आम्ही सर्वांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत याच विचारसरणीचे आहोत. पण जर ते माफी मागत नसतील तर त्यांच्यासोबत मैत्रीचा हात कसे पुढे करणार?

'पाकने केलेला नरसंहार अन् लाखो महिलांवरील बलात्कार देश विसरलेला नाही'

sakal_logo
By
सुशांत जाधव

1971 मध्ये मुक्ती युद्धामुळे देशातील मोठा हिस्सा गमावलेला पाकिस्तान चीनच्या सांगण्यावरुन आता बांगलादेशसोबत मैत्रीसाठी प्रयत्न करत आहे. पाकिस्तान भलेही पाच दशकापूर्वीच घटना विसरला असेल पण कोटयवधी जनतेच्या काळजाला झालेल्या जखमा आम्ही बांगलादेश अद्यापही विसरलेला नाही. पाकिस्तानमधील नरसंहार आणि महिलांवर झालेला बलात्काराची घटना आम्ही विसरलेलो नाही, असे सांगत बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावले आहे. जनतेवर झालेल्या अन्यायानंतर पाकने कधीही माफी मागितली नाही, असा उल्लेख करत बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानसोबतचे संबंध अजूनही टोकाचे आहेत, असे संकेत दिले आहेत.   

अग्रलेख : आर्थिक सुधारणांचे मैदान

भारताविरोधातील रणनितीच्या पार्श्वभूमीवर चीनच्या सांगण्यावर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी 22 जुलै रोजी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली होती. दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी पूरजन्य आणि कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशिवाय द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या संदर्भातही चर्चा केल्याचे वृत्त होते. यावेळी पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दाही उपस्थितीत केला. या भेटीनंतर बांगलादेश काय भूमिका घेणार याची चर्चा आंतरराष्ट्रीय राजकारणात सुरु झाली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषकांनी दोन्ही राष्ट्रांतील इतिहासामुळे इस्लामाबाद-ढाका यांच्यातील संबंध सुरळीत होतील, यावर शंका व्यक्त करण्यात येत  आहे.  

चीनला रोखण्यासाठी भारताने सीमारेषेवर तैनात केला T-90 टँकचा ताफा

बांग्ला न्यूज 24 च्या वृत्तानुसार, पाकिस्तानसोबतची बैठकीला बांगलादेशने सकारात्मक उत्तर दिले तर भारत-चीन यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत बांगलादेशची भूमिका नेमकी काय आहे हे स्पष्ट होईल. दरम्यान बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री एके अब्दुल मेनन यांनी पाक-बांगलादेश पंतप्रधानांच्या भेटीसंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले की, इमरान खान यांनी कोवि-19 आणि पूरजन्य परिस्थितीवर चर्चा केली. या बैठकीत अन्य कोणत्याही मुद्यावर चर्चा झालेली नाही. पाकिस्तान आमच्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यास इच्छुक असेल तर ती चांगली बाब आहे. मुक्ती युद्धावेळी पाकिस्तानने 30 लाख लोकांचा केलेला नरसंहार आणि लाखो लोकांवर केलेला बलात्कार देश विसरलेला नाही, असा उल्लेखही त्यांनी केला.   

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

मेनन म्हणाले की,  1971 च्या मुक्ती युद्धावेळी पाकिस्तानने जो  नरसंहार केला त्याबदद्दल त्यांनी आतापर्यंत कधीही माफी मागितलेली नाही. आम्ही सर्वांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत याच विचारसरणीचे आहोत. पण जर ते माफी मागत नसतील तर त्यांच्यासोबत मैत्रीचा हात कसे पुढे करणार? पाकिस्तानने केलेला अत्याचार देश विसरला नसल्याचे सांगत पाक-बांगलादेश मैत्री सध्याच्या घडीला शक्य नाही, असेच संकेत परराष्ट्र मंत्र्यांनी दिले आहेत.