

Death Threats to Bangladesh Television Anchor Nazneen Munni
esakal
journalist death threat in Bangladesh : बांगलादेशातील माध्यम स्वातंत्र्यही धोक्यात आल्याचं दिसत आहे. विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर राजधानी ढाकामध्ये उफाळेला हिंसाचार आता बांगलादेशातील दोन आघाडीच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांपर्यंतही पोहोचला आहे. एवढंच नाहीतर, ग्लोबल टीव्ही बांगलादेशच्या न्यूज हेड नाजनीन मुन्नी यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
प्राप्त माहितीनुसार काही कट्टरपंथी विचारसरणीच्या तरुणांनी त्यांना केवळ नोकरीवरून काढून टाकण्यासाठीच धमकी दिली नाही तर चॅनेलचे कार्यालयच जाळून टाकण्याचीही धमकी दिली आहे. खरंतर, पत्रकार आणि अँकर असलेल्या नाजनीन मुन्नी यांचे भारताशी कोणतेही संबंध नाहीत आणि त्यांचा माजी पंतप्रधान शेख हसीना किंवा अवामी लीगशी देखील कोणताही राजकीय संबंध नाही. मात्र तरीही त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
नाजनीन मुन्नी सध्या ग्लोबल टीव्ही बांगलादेशमध्ये न्यूज हेड म्हणून काम करतात. त्या जुलैमध्ये चॅनेलमध्ये रूजू झाल्या. यापूर्वी, त्यांनी डीबीसी न्यूजमध्ये असाइनमेंट एडिटर म्हणून काम केले होते. एक प्रोफेशनल जर्नलिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे.
नाझनीन मुन्नी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की २१ डिसेंबरच्या रात्री सात ते आठ तरूण, भेदभाव विरोधी विद्यार्थी चळवळीच्या महानगर समितीचे सदस्य असल्याचा दावा करत चॅनेलच्या कार्यालयात आले. त्यांनी म्हटले आहे की जर नाझनीन मुन्नी यांना ४८ तासांच्या आत काढून टाकले नाही तर प्रथम आलो आणि डेली स्टार कार्यालयांप्रमाणेच तुमचे कार्यालय देखील जाळून टाकले जाईल. १८ डिसेंबर रोजी प्रथम आलो आणि डेली स्टारच्या कार्यालयांवर हिंसक हल्ला करण्यात आला होता.
नाझनीन मुन्नी यांच्या मते, तरुणांनी चॅनेलचे एमडी अहमद हुसेन यांना विचारले, "तुम्ही नाझनीन मुन्नी यांना का कामावर ठेवले? ती अवामी लीगशी संबंधित आहे आणि तिला काढून टाकले पाहिजे." एमडीने स्पष्टपणे सांगितले की नाझनीन मुन्नी यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही आणि त्यांची नियुक्ती गुणवत्तेच्या आधारे करण्यात आली आहे. नाझनीन यांनी सांगितले की तरुणांनी एमडींना ४८ तासांच्या आत काढून टाकण्याचा कागद दिला आणि त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणला. एमडीने सही करण्यास नकार दिला आणि ते तरुण संतापले आणि त्यांनी त्याला धमकावण्यास सुरुवात केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.