बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग; ३५ कामगारांचा होरपळून मृत्यू, ४५० जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग; ३५ कामगारांचा होरपळून मृत्यू, ४५० जण जखमी
बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग; ३५ कामगारांचा होरपळून मृत्यू, ४५० जण जखमी

बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग; ३५ कामगारांचा होरपळून मृत्यू, ४५० जण जखमी

बांगलादेशातील (Bangladesh) चटगाव येथे शनिवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. बांगलादेशमधील चितगॉंग येथे एका शिपिंग केंटेनर डेपोला लागलेल्या भीषण आगीत तब्बल ३५ जणांचा मृत्यू झाला असून साधारण ४५० जण जखमी झाले आहेत.

४ जून रोजी रात्री ही भीषण आग लागली होती. या घटनेत पाच अग्निशमन दलाचे जवानदेखील मृत्युमुखी पडले असून अजूनही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही.

हेही वाचा: इम्रान खान यांच्या हत्येच्या अफवा; पाकिस्तानात हाय अलर्ट

सरकारी चटग्राम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (CMCH) येथे तैनात असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशमधील चितगॉंग मधील शितकुंडा येथे एका शिपिंग कंटेनरच्या डेपोला भीषण आग लागली. या आगीमध्ये आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला असून ४५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: भारत-बांगलादेश मैत्रीतूनच साधेल प्रगती!

चित्तगॉंग वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात नियुक्त करण्यात आलेले पोलीस अधिकारी नुरुल अलाम यांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग रासायनिक अभिक्रिया झाल्यामुळे लागली असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. तसेच रात्री साधारण ९ वाजता ही आग लागली होती. त्यानंतर येथे मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे आग पसरली असं सांगण्यात येतंय. या घटनेची नंतर सखोल चौकशी केली जाणार आहे.

Web Title: Bangladesh News 25 Killed 450 Injured In Chittagong Container Depot Fire

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :bangladesh
go to top