भारत-बांगलादेश मैत्रीतूनच साधेल प्रगती!

शेख हसीना यांच्याकडे गेल्या दशकापासून बांगलादेशाचे नेतृत्व असल्याने द्विपक्षीय आघाड्यांवर दोन देशांतील सहकार्य खूपच चांगले आहे, मात्र ते मोठ्या काळासाठी कायम राहणे आवश्‍यक आहे.
narendra modi and shaikh hasina
narendra modi and shaikh hasinasakal

- महेंद्र वेद, ज्येष्ठ पत्रकार

शेख हसीना यांच्याकडे गेल्या दशकापासून बांगलादेशाचे नेतृत्व असल्याने द्विपक्षीय आघाड्यांवर दोन देशांतील सहकार्य खूपच चांगले आहे, मात्र ते मोठ्या काळासाठी कायम राहणे आवश्‍यक आहे. दोन्ही देशांच्या सीमेपलीकडून व एकूण संपूर्ण भागातून कारवाया करणाऱ्या इस्लामिक दहशतवादी संघटनांशी लढणे ही दोन्ही देशांची समान डोकेदुखी आहे आणि चीनची डोकेदुखी भविष्यात वाढणार आहे. या परिस्थितीत दोन्ही देशांनी आपले मैत्रीपूर्ण संबंध कायम राखणे दोघांसाठीही फायद्याचे ठरेल.

एखाद्या देशासाठी पन्नास वर्षे हा मैलाचा दगड असतो. बांगलादेश (Bangladesh) हा देश तरुण नाही किंवा म्हाताराही झालेला नाही. या देशाला आनंदी होण्याची अनेक कारणे आहेत, त्यांना आपला भूतकाळही ध्यानात ठेवावे लागेल आणि पुढे जात राहात भविष्यावरही लक्ष केंद्रित करावे लागले. बांगलादेशाची मुक्ती एका रक्तरंजित संघर्षाने झाली व तिला लोकशाही (Democracy) व्यवस्थेची आकांक्षा असलेल्यांनी नियंत्रित केले. बांगलादेशाचा जन्म झाला, त्यावेळी या देशाची ‘ॲन इंटरनॅशनल बास्केट केस’ अशी संभावना केली गेली होती. मात्र, देश आता आपली ‘अविकसित’ ही ओळख पुसून काढत विकसनशील देश ओळख मिळवतो आहे व त्याचबरोबर मध्यम आकाराची अर्थव्यवस्था म्हणून उदयास येण्याचे स्वप्न पाहतो आहे. देशाचे काही मानवी विकास निर्देशांक दक्षिण आशियातील (South Asia) सर्व देशांच्या तुलनेत सर्वोत्तम आहेत. बांगलादेशच्या मुक्तीसाठी रक्त सांडलेल्या भारतालाही (India) त्याने मागे टाकले आहे.

बांगलादेशाच्या मुक्तीच्या घटनेने जगाचा नकाशाच बदलून गेला व त्याचबरोबर हा समजही उद्ध्वस्त केला, की भेदभावाची वागणूक मिळत असून धर्म लोकांना एकत्र बांधून ठेवतो आणि भौगोलिक अंतराने दूर असलेला, तसेच आपल्या भाषा आणि संस्कृती वेगळी ओळख असलेला देश दुय्यम सहकारी म्हणून कायम राहू शकतो. या १६ डिसेंबरला भारतीय नागरिक या घटनेचा गौरवाने उल्लेख करतील अशी आशा आहे. याचे दुसरे कारण या दिवशी तीन महिन्यांच्या युद्धानंतर एक अभूतपूर्व विजय संपादन केला होता. त्या घटनेची संगती आज लावताना हे लक्षात घ्यायला हवे, की बांगलादेशचे संस्थापक शेख मुजिबूर रहमान यांनी त्यावेळी निरोपाची सलामी घेतली होती व आज या देशाचे नेतृत्व त्यांनी कन्या शेख हसीना यांच्याकडे आहे. त्या भारताचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करताना कधीच थकत नाहीत. त्यामुळे दोन देशांतील संबंध एकमेवाद्वितीय ठरतात.

मात्र, कृतज्ञतेमुळे दोन देशांतील संबंध कायमचे टिकून राहू शकत नाहीत. वेगवेगळे आकार आणि ताकद असलेले शेजारी देश असल्याने अनेक समस्याही निर्माण होतात. परस्पर संबंध सहकार्याचे असावे लागतात, स्पर्धेचे नाही. अन्यथा संघर्ष निर्माण होतात. भारत-बांगलादेशात याचे काही प्रमाणात पाळले गेले असले, तरी पूर्णपणे नाही. जगाची भू-राजकीय स्थिती सातत्याने बदलत असताना, भू-आर्थिक संबंधांमुळे संघर्ष निर्माण होत असताना व जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे देशांचे प्राधान्यक्रम बदलत असताना हे स्थिती नक्कीच समाधानकारक आहे. दोन्ही देशांनी आपली जमीन आणि सागरी हद्दीचे विषय सोडवताना खूप चांगली कामगिरी केली आहे. दक्षिण आशियामध्ये चीनच्या अभूतपूर्व मुसंडीमुळे व त्याचबरोबर भारताकडून सर्व बाजूंनी ‘घेरलेला’ असल्याने बांगलादेशपुढे काही आव्हाने आहेत व संधीही. भारत सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या बांगलादेशाच्या जवळ आहे व सर्वाधिक मदत पुरवणारा देशही आहे. मात्र, चीन सर्वांत मोठा शस्त्र पुरवठादार व व्यापार करणारा देश आहे.

आव्हान दहशतवादाचे...

यातील सर्वांत मोठे आव्हान आहे दहशतवादाचा मुकाबला हे आहे व त्याचबरोबर भारताच्या अस्थिर ईशान्य भागातील नागरिकांच्या संरक्षणाचेही आहे. दोन्ही देश दहशतवादाचे बळी ठरले आहेत. त्याचबरोबर धर्म राजकारणाच्या जाळ्यात अडकल्याने, लोकसंख्या वाढीची समस्या निर्माण झाल्याने व सामाजिक व आर्थिक कारणांमुळे बांगलादेशी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात भारतात स्थलांतर झाले. यामागे हाताला काम, सुरक्षा ही कारणेही महत्त्वाची होती. या धार्मिक बहुसंख्यकांना राजकीय विचारसरणीला दूर ठेवणे परवडणारे नव्हते व त्यामुळे स्थलांतरात मोठी भर पडली. शेख हसीना यांच्याकडे गेल्या दशकापासून बांगलादेशाचे नेतृत्व असल्याने या सर्व आघाड्यांवरील दोन देशांतील सहकार्य खूपच चांगले होते, मात्र ते मोठ्या काळासाठी कायम राहणे आवश्‍यक आहे. दोन्ही देशांच्या सीमेपलीकडून व एकूण संपूर्ण भागातून कारवाया करणाऱ्या इस्लामिक दहशतवादी संघटनांशी लढणे ही दोन्ही देशांची समान डोकेदुखी आहे. पंतप्रधानांच्या मागील ढाका भेटीदरम्यान झालेली निदर्शने व नुकत्याच झालेल्या नवरात्रोत्सवात पूजा मंडपांवरील हल्ले यांमुळे अस्वस्थता निर्माण झाली व भारतात याविरोधात प्रतिक्रियाही उमटल्या. सरकारी पातळीवर या गोष्टींना मुद्दाम कमी महत्त्व दिले गेले, कारण सार्वजनिकरित्या एकमेकांवर दोषारोप करणे कोणाच्याच फायद्याचे ठरणारे नाही.

भारताकडून स्थलांतर रोखण्यासाठी ‘सीएए’ आणि ‘एनपीसी’सारखे कायदे आणण्‍याच्या व लोकसंख्येची स्थिती बदलण्याच्या प्रयत्नांबद्दल बांगलादेश खूपच संवेदनशील आहे. भारताचे बेकायदा राहणाऱ्या स्थलांतरितांना शोधणे आणि परत पाठवण्याचे प्रयत्न दोन्ही देशांसाठी जातीय विद्वेषाचे कारण बनू शकते. भूतकाळातील हे ओझे मोठा समजूतदारपणा दाखवत वाहून नेणे हे दोन्ही देशांसाठीचे सर्वांत मोठे आव्हान आहे.

लुक ईस्ट, ॲक्ट ईस्ट...

बांगलादेशाची आर्थिक झेप फायद्याची ठरेल, तर भारताने ईशान्य भारताच्या विकासासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहेत. त्यातूनच या दक्षिण आशियायी देशांना आग्नेय आशियात प्रवेश मिळू शकेल. या भागात छोट्या व वेगाने प्रगती करणाऱ्या अर्थव्यवस्थांचे सहकार्य मिळवता येईल. त्यामुळे भारत व बांगलादेशाने ‘लुक ईस्ट, ॲक्ट ईस्ट’ हे धोरण राबविणे गरजेचे आहे. बांगलादेशानेच ५० वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे व स्वातंत्र्य उपभोगणारी ही त्यांची तिसरी पिढी आहे. गंभीर इस्लामी आव्हाने असली, तरी शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली देशाने आपली मुक्तीची गाथा चांगल्या प्रकारे जोपासली आहे. पुराणमतवादी समाजाच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेला ते महत्त्व देतात. हा उघड दिसणारा विरोधाभास भारताने योग्य प्रतिसाद दिल्यासच टिकून राहू शकतो. तसे न झाल्यास, त्या देशातील व जगभरातील मुस्लिमांचा प्रभाव व पाकिस्तानच्या १९७१च्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत-बांगलादेश संबंध बिघडावेत म्हणून सुरू असलेल्या कुरापती चांगल्याच जोर धरतील. त्यामुळे जबाबदारी दोन्ही देशांच्या खांद्यावर आहे.

नुकताच बांगलादेश-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना पाकने जिंकल्यानंतर काही बांगलादेशी नागरिकांनी बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानचा जयजयकार केला. हा साधा क्रिकेटचा सामना होतो व काही जणांच्या मते या घोषणा मॅनेज करण्यात आल्या होत्या, तरीसुद्धा यातून एक स्पष्ट संदेश जातो. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या विजयानंतरच्या झालेल्या जल्लोषाप्रमाणेच या घोषणा अनिष्टाच्या सूचक आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यात कोणत्याही द्विपक्षीय अथवा प्रादेशिक प्रश्‍नावर मतभेद झाल्यास मोठे नुकसान होईल व ते दोन्ही देशांचे असेल. या परिस्थितीत बाहेरून कोणतीही मदत येणार नाही. बांगलादेश आणि पाकिस्तानशी ‘मैत्री’ व भारताशी ‘शत्रुत्व’ असलेल्या चीनकडून मदत येणार नाही. भारत-बांगलादेशाने आपसांतील प्रश्‍न सामोपचाराने सोडवणे, त्यात शब्दांपेक्षा कृती अधिक ठेवणे, एकत्र येऊन विकास साधणे, एकमेकांची मूल्ये जोपासणे व टिकवणे हीच मुक्ती संग्रामादरम्यान बलिदान केलेल्यांना खरी आदरांजली ठरेल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com