भारताने शेजार धर्म पाळला; शेख हसीना यांनी मानले PM मोदींचे आभार

युक्रेनमधील भारतीयांसाठी भारत सरकारकडून ऑपरेशन गंगा राबवले जात आहे.
narendra modi and shaikh hasina
narendra modi and shaikh hasinasakal

ढाका : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) अडकलेल्या भारतीयांची सुखरूप सुटका करण्यासाठी भारत सरकारकडून ऑपरेशन गंगा (Operation Ganga) राबवले जात आहे. या मोहिमेअंतर्गत भारत सरकारकडून भारताव्यतिरिक्त इतर देशांतील नागरिकांनाही बाहेर काढण्यात आले असून, बांगलादेशातील नऊ नागरिकांना अशाच प्रकारे सुखरूप बाहेर काढल्याबद्दल बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. (Bangladesh PM Sheikh Hasina Thanks To Modi For Help )

'ऑपरेशन गंगा' अंतर्गत भारताने पाकिस्तान, नेपाळ आणि ट्युनिशियासह इतर अनेक देशांतील अडकलेल्या नागरिकांचीदेखील सुखरूप सुटका केली आहे. या मदतीसाठी पाकिस्तानमधील (Pakistan) एका विद्यार्थ्याने युक्रेनमधून सुखरूप सुटका केल्याबद्दल कीवमधील (Kyiv) भारतीय दूतावास आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले होते. याबाबतच एक व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. (Indians In Ukraine)

narendra modi and shaikh hasina
'बाळासाहेबांना सांगू, तुमचा सुपूत्र...', फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

सुमीतून सर्व भारतीयांची सुटका

दरम्यान, युक्रेनमधील सुमी (Sumy) येथून सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून मंगळवारी सांगण्यात आले आहे. सुमीमध्ये रशियन सैन्याकूडन मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात येत होते. त्यामुळे येथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थांना बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर या ठिकाणचे हल्ले काही तासांसाठी थांबलण्यात आले होते. त्यानंतर येथील अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली होती. या ठिकाणी भारतातील 694 विद्यार्थी अडकले होते. गेल्या दोन आठवड्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, युक्रेनचे मोठे नुकसान होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com