

Mohammed Shahabuddin Resignation
ESakal
बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी राजीनामा दिला आहे. सभापती हाफिज उद्दीन अहमद यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राष्ट्रपती पद रिक्त असल्याने घटनेनुसार, नवीन राष्ट्रपतींची नियुक्ती होईपर्यंत सभापतीच राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतील. सभापतींनी सांगितले की, त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अनेक आजारांनी त्रस्त असल्याने ते राष्ट्रपतीपदासारख्या महत्त्वाच्या घटनात्मक पदाची कर्तव्ये शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पार पाडण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.