esakal | आणखी एका शेजाऱ्यानं भारताशी घेतला पंगा, निर्यात रोखली
sakal

बोलून बातमी शोधा

india patrapole

पेट्रोपोल बेनापोलच्या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये वर्षाला जवळपास 35 हजार कोटींचा व्यापार होतो.

आणखी एका शेजाऱ्यानं भारताशी घेतला पंगा, निर्यात रोखली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ढाका - भारत चीन सीमेवर वाद सुरु असताना नेपाळनेसुद्धा त्यांच्या नकाशात भारतीय भूभाग समाविष्ट करून कुरापती सुरु केल्या आहेत. भारत चीन संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. यातच आता बांगलादेशकडूनही वेगळ्याच हालचाली केल्या जात आहे. पश्चिम बंगालमधील पेट्रोपोल बॉर्डरवरून भारत आणि बांगलादेश यांच्यात मोठ्या प्रमाणावर आयात निर्यात केली जाते. बांगलादेशी व्यापारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून झालेल्या आंदोलनामुळे गुरुवारी पेट्रोपोल सीमेवरून बांगलादेशात भारताचा एकही ट्रक गेला नाही. पर्यायाने निर्यात होणारा माल बांगलादेशात पोहोचू शकला नाही. 

बांगलादेश सीमेवर दोन्ही बाजूला शेकडो ट्रक उभा आहेत. विरोध करत असलेल्या बांगलादेशी व्यापाऱ्यांनी सांगितले की, जोपर्यंत भारत बांगलादेशातून आयातीला मंजुरी देत नाही तोपर्यंत भारतातून निर्यातीला परवानगी देणार नाही. विरोध करणाऱ्यांनी भारतीय ट्रक बांगलादेशमध्ये जाण्यापासून रोखले. बुधवारी अनेक तास ही वाहतूक बंद ठेवली. त्यांनी म्हटलं की, जोपर्यंत भारत आयातीला मंजुरी देणार नाही तोपर्यंत सीमा बंद राहील. यामुळे दोन्ही बाजूला शेकडो ट्रक उभा असून त्यातील माल खराब होत चालला आहे. 

हे वाचा - दलित आहे म्हणून उच्चवर्णीय भारतीयांकडून अपमानास्पद वागणूक

दरम्यान, भारतीय निर्यात महासंघ फियोचे पूर्व भागातील अध्यक्ष सुशील पटवारी म्हणाले की, गुरुवारी भारतातून पेट्रोपोल इथून कोणतीही निर्यात झाली नाही. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली.

भारत सरकारने 7 जूनला भारतीय व्यापाऱ्यांना बांगलादेशमध्ये निर्यात करण्यास मंजुरी दिली. मात्र एक महिना होत आला तरी बांगलादेशमधून आयात करण्यास मंजुरी देण्यात आलेली नाही. विरोध करत असलेल्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, आम्ही जो माल भारतातून आयात करतो तो तयार करून पुन्हा निर्यात केला जातो. पण भारताने आयात बंद केल्यानं आमचं मोठं नुकसान होत आहे. पेट्रोपोल बेनापोलच्या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये वर्षाला जवळपास 35 हजार कोटींचा व्यापार होतो.