

Sheikh Hasina
esakal
शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परत जाण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय उलथापालथ तीव्र झाली असून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान तारिक रहमान यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नव्याने उसळलेल्या राजकीय हिंसाचाराबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, "आता खूप झाले. आपल्याला त्या दहशतवाद्यांना, जाळपोळ करणाऱ्यांना आणि मारेकऱ्यांना चोख प्रत्युत्तर द्यावे लागेल."