

Bank Vault washed in Nepal flood
ESakal
काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील रसुवा जिल्ह्यामध्ये आलेल्या महाप्रलयामध्ये अनेक गावे वाहून गेली आहेत. जलविद्युत प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले असून शेकडो परदेशी नागरिकांसह महाराष्ट्रातील पर्यटक देखील अद्याप बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी आणि अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी नेपाळची सुरक्षा दले शर्थीचे प्रयत्न करत आहेत.