Diwali Festival 2020 : लक्ष्मी मातेचे पहिले चित्र काढणारा चित्रकार आहे तरी कोण?

raja ravi warma draw the first picture of goddess laxmi
raja ravi warma draw the first picture of goddess laxmi

नागपूर : दिवाळीचा सण हा वसूबारसपासून सुरू होतो. काल धनत्रयोदशी झाली आणि आज लक्ष्मीपूजन. पण, आजच्या दिवशी आपण ज्या लक्ष्मीची पूजा करणार आहोत, त्याच लक्ष्मी मातेचे चित्र कुणी साकारले, हे आपल्याला माहिती आहे का? तर हे चित्र साकारणारा चित्रकार म्हणजे राजा रवी वर्मा. त्यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची अनेक रंगीत चित्रे काढली. त्यांनी हिंदूंच्या अनेक देवी-देवतांचे चित्र काढल्याचे इतिहासाचे जाणकार सांगतात. त्यांनी काढलेल्या चित्रांवरूनच आपले देवी-देवता असे दिसत असतील असे हिंदूंना समजल्याचे बोलले जाते. 

राजा रवी वर्मांच्या चित्रकारीतेची सुरुवात -

राजा रवी वर्मांचा  जन्म २९ एप्रिल १८४८ रोजी केरळमधील कोईल तंपुरन येथील किलिमनूर राजवाड्यात  एका राजघराण्यात  झाला. त्यांचे वडील मोठे विद्वान व आई ही कवयित्री होती. त्यांच्या आईने लिहिलेले काव्य, 'पार्वती स्वयंवर' हे रवी वर्माने तिच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध केले. राजा रवी वर्माला सी. गोडा वर्मा नावाचा भाऊ व मंगला नावाची बहीण होती. त्यांच्या बालपणीच त्यांना महाराज अलियम् तिरुनल या त्यांच्या नातलग राजाचा आश्रय मिळाला. रवी वर्मा यांचे काका उत्तम चित्रकार होते. तोच चित्रकलेचा वारसा पुतण्यात उतरला. याशिवाय तिरुवनंतपुरमच्या राजदरबारी असणारे इंग्रज चित्रकार थी ओडेर जेन्सन, रामस्वामी नायडू यांच्या चित्रकारितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्रावणकोर महाराजांच्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या चित्रकारितेला अधिकच प्रेरणा मिळाली. ते त्रावणकोरचे राजचित्रकार बनले. त्यांनी १८७३ मध्ये मद्रास येथील चित्रकलेच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. महाराजांच्या दरबारात असणाऱ्या इटालियन तैलचित्रांकडे पाहून त्याने तैलचित्रे काढण्याचे ठरवले. राजा रवी वर्माने चित्रांत एक सुंदर, प्रमाणबद्ध सौंदर्यवती साडी नेसलेली स्त्री दिसते. त्याबाबत अनेक वाद देखील आपण ऐकलेले आहेत. 

मानवी रुपात साकारले लक्ष्मी मातेचे चित्र - 

राजा रवी वर्मांच्या चित्रकारीता पाहून बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या राज्यभिषेकाचे चित्रं काढण्यासाठी त्यांनी १८८२ साली राजा रवी वर्माला बडोद्याला आमंत्रित केले. त्यानंतर वर्मांनी महाराजांची अनेक चित्र काढली. ते अजूनही त्यांच्या दरबारात असल्याचे बोलले जाते. वर्मा यांनी बडोदा प्रांतातच १८९१ साली लक्ष्मी मातेचे पहिले चित्र काढले.  यापूर्वीही अनेकजणांनी चित्र काढली होती. मात्र, मानवी रुपात लक्ष्मी मातेचे चित्र काढणारे राजा वर्मा हेच पहिले चित्रकार होते. साडीतील लक्ष्मी मातेचे चित्र फारच देखणे होते. त्यांनी काढलेल्या लक्ष्मी मातेच्या चित्रामुळे राजा रवी वर्मा आणखीनच प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदू-देवतांची सुंदर चित्र साकारली.

राजा रवी वर्मा यांनी काढलेले हे चित्र अनेकांना आवडले. त्यानंतर एका प्रटींग प्रेसवाल्याने त्यांच्या या चित्राच्या अनेक प्रिंट काढल्या आणि अशाप्रकारे लक्ष्मी मातेचे चित्र सर्वांच्या घराघरात पोहोचले. 

संकलन व संपादन - भाग्यश्री राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com