लहानपणी रामायण-महाभारतातील कथा ऐकायचो, ओबामांनी उघड केलं गुपित

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

बराक ओबामा यांनी 'अ प्रॉमिस्ड लँड' नावाच्या आपल्या पुस्तकात भारताविषयी असलेल्या त्यांच्या आकर्षणाबद्दल लिहलंय.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा अलिकडे त्यांच्या एका पुस्तकामुळे विशेष चर्चेत आहेत. 'अ प्रॉमिस्ड लँड' नावाच्या या पुस्तकात अनेक असे संदर्भ आणि भाष्य आहेत ज्यावरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या पुस्तकाचे प्रकाशन अजून व्हायचे आहे. मात्र, तरीही या पुस्तकातील त्यांनी केलेल्या अनेक उल्लेखांमुळे हे पुस्तक खूपच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्याविषयी त्यांनी केलेला उल्लेख चर्चेत आला होता. आणि आता या पुस्तकात माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी म्हटलंय की लहानपणी ते इंडोनेशियामध्ये असताना हिंदू महाकाव्य रामायण आणि महाभारतातील कथा ऐकायचे. आणि म्हणून त्यांच्या मनात भारताविषयी कायमच एक विशेष स्थान राहिले आहे. 

हेही वाचा - VIDEO : रेड सीमध्ये केला अनोखा विक्रम; सलग सहा दिवस राहिला पाण्यात
बराक ओबामा यांनी 'अ प्रॉमिस्ड लँड' नावाच्या आपल्या पुस्तकात भारताविषयी असलेल्या त्यांच्या आकर्षणाबद्दल लिहलंय. त्यांनी म्हटलंय की, असं असू शकतं की भारताचा आकारच असा आहे की जो आकर्षित करतो जिथे जगातील लोकसंख्येचा सहावा भाग राहतो. जिथे जवळपास दोन हजार वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात, आणि जिथे सातशेहून अधिक भाषा  बोलल्या जातात. ओबामा यांनी 2010 मध्ये राष्ट्राध्यक्ष असताना भारत दौरा केला होता. त्याआधी कधीच ते भारतात आले नव्हते. त्यांनी म्हटलंय की या देशाबाबत माझ्या मनात नेहमीच एक विशेष स्थान राहिले आहे. 
ओबामा यांनी म्हटलंय की, याचं एक कारण असंही असू शकतं की इंडोनेशियामध्ये माझ्या लहानपणीचा काही काळ मी हिंदू महाकाव्य रामायण आणि महाभारतातील कथा ऐकत ऐकत घालवला होता किंवा याचं कारण असं असू शकतं की पूर्वेकडील धर्मांमध्ये माझी आवड असू शकते वा याचं एक कारण की कॉलेजमधील माझे पाकिस्तानी तसेच भारतीय मित्रांचा समूह आहे ज्यांनी मला दाल आणि कीमा बनवायला शिकवला होता तसेच मला बॉलिवूडचे चित्रपट दाखवले होते. 

हेही वाचा - रुग्णासाठी डॉक्टर झाला 'बॅटमॅन'
'अ प्रॉमिस्ड लँड' मध्ये ओबामा यांनी 2008 मधील आपल्या निवडणूक प्रचार अभियानापासून ते राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या पहिल्या कार्यकाळाच्या शेवटी ऐबटाबादमधील अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला मारण्याच्या आपल्या कामगिरीपर्यंतच्या प्रवासाचे विवरण केले आहे. या पुस्तकाचा दुसरा भागदेखील येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: barack obama spent his childhood listening stories of ramayana and mahabharata