esakal | भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन'ला मिळणार मंजुरी; WHO ने दिले संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

soumya swaminathan

भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) स्वदेशी कोवॅक्सिन लशीचा वापर भारतामध्ये सुरु आहे. पण, आंतरराष्ट्रीय पातळीवर या लशीच्या वापराला मंजुरी मिळालेली नाही.

'कोवॅक्सिन'ला मिळणार मंजुरी; WHO ने दिले संकेत

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) स्वदेशी कोवॅक्सिन लशीचा वापर भारतामध्ये सुरु आहे. पण, आंतरराष्ट्रीय पातळीवर या लशीच्या वापराला मंजुरी मिळालेली नाही. असे असताना जागतिक आरोग्य संघटनेकडून World Health Organization (WHO) भारत बायोटेकला सकारात्मक संकेत मिळाले आहेत. 'WHO च्या प्रमुख वैज्ञानिक सौमया स्वामीनाथन (Soumya Swaminathan) म्हणाल्या की, कोवॅक्सिनचा अंतिम टप्प्यातील डेटा चांगले रिझल्ट दाखवत आहे.' (Bharat Biotech Covaxin to get WHO nod soon Chief scientist Soumya Swaminathan says trial data looks good)

भारत बायोटेक आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक 23 जून रोजी पार पडली होती. या बैठकीचा हवाला देत स्वामीनाथन म्हणाल्या की, 'कोवॅक्सिन लशीची डेल्टा विरोधात लढण्याची शक्ती थोडी कमी आहे. पण, वाईटही नाही. एकूण लशीचा प्रभावीपणा चांगला आहे. अंतिम टप्प्यातील रिझल्टमधून तरी तसंच दिसत आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानांकन पूर्ण करताना दिसत आहे.' स्वामीनाथन यांच्या या सकारात्मक वक्तव्यामुळे कोवॅक्सिनला लवकरच मंजुरी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: विमान अपघातात स्वीडनमध्ये 9 जणांचा मृत्यू

भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्यातील लशीच्या प्रभावीपणाचे रिझल्ट जाहीर केले आहेत. यात कोरोना विषाणूवर लस 77.8 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय डेल्टा व्हेरियंटविरोधात B.1.617.2 (Delta) लस 65.2 टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतात सध्या याच व्हेरियंटचा प्रादुर्भाव आहे. जागतिक आरोग्य संघटना लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यासाठी सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. असे असले तरी अंतिम डेटाची आम्ही वाट पाहात असल्याचं त्या म्हणाल्या.

हेही वाचा: 'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

भारतातील कोरोना स्थितीवर बोलताना सौमया स्वामीनाथन म्हणाल्या की, 'देशात 60 ते 70 टक्के लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. भारताने सध्या बुस्टर डोसवर लक्ष द्यायला नको, तर जास्तीत जास्त लोकांना कशाप्रकारे प्राथमिक लस मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवा. एका मोठ्या लोकसंख्येला लशीचा डोस मिळाल्यास हर्डइम्युनिटी तयार होईल. त्यानंतर यूकेसारखं भारताला बुस्टर डोसकडे वळता येईल.'

loading image