बायडेन प्रशासनात महिलांचे वर्चस्व; भारतीय वंशाच्या या महिलेचा होणार समावेश

यूएनआय
Tuesday, 1 December 2020

अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्‍या आर्थिक सल्लागार गटातील वरिष्ठ सदस्यांची नावे लवकरच जाहीर होणार असून त्यात भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प विभागाच्या संचालकपदी होण्याची शक्यता आहे, असे वृत्त ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्‍या आर्थिक सल्लागार गटातील वरिष्ठ सदस्यांची नावे लवकरच जाहीर होणार असून त्यात भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प विभागाच्या संचालकपदी होण्याची शक्यता आहे, असे वृत्त ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेच्या सत्तेची सूत्रे 
२० जानेवारी रोजी हाती घेणाऱ्या बायडेन यांनी मंत्रिपदावर आणि संभाव्य प्रशासनातील प्रमुख पदांवर महिलांची नियुक्तीस प्राधान्य दिले आहे. संरक्षण क्षेत्रातील महत्त्वांच्या पदांवरही महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ‘सीआयए’च्या संचालकपदी अल्वरिल हेन्स, गृहमंत्रिपदी लुलेन राईस, संरक्षण मंत्रिपदी मिशेल फ्लोरनोय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आर्थिक सल्लागार परिषदेच्या प्रमुखपदी अर्थतज्ज्ञ सिसिलिया रोस यांची निवड होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी कमला हॅरिस आहेतच.

आली रे आली कोरोनाची लस आली! मॉडर्ना कंपनीची मोठी घोषणा

कमला हॅरिस यांच्याप्रमाणे बायडेन प्रशासनात अजून काही भारतीय वंशाच्या महिलांची महत्त्वाच्या पदांवर निवड होणार असल्याची चर्चा आहे, त्यात एक नाव म्हणजे नीरा टंडन यांचे आहे. वॉशिंग्टनमधील सर्वांत प्रभावशाली महिलांमध्ये नीरा टंडन यांचा समावेश २०१२मध्‍ये ‘नॅशनल जर्नल’ने केला होता. याशिवाय २०१४मधील ‘ वर्किंग वूमेन मासिकाच्या जगातील ५० प्रभावशाली मातांच्या यादीत त्यांना स्थान मिळाले आहे. या वर्षीदेखील ‘एली’ मासिकाने त्यांची सर्वांत प्रभावी महिलांमध्ये निवड केली आहे.  

ज्यो बायडेन यांच्या कुत्र्यानेही रचला इतिहास; जाणून घ्या कोणत्या विक्रमाची रंगतीये चर्चा 

अनुभवी प्रशासक
नीरा टंडन या ओबामा प्रशासनातही सल्लागार होत्या. सध्या टंडन या ‘सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस’ या संस्थेच्या प्रमुख आहेत. २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या सल्लागार म्हणून त्यांनी जबाबदारी पेलली आहे. नव ऊर्जा प्रक्रियेच्या मुद्द्यावर त्यांनी माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याबरोबरही काम केले आहे. त्या वेळी त्या अंतर्गत धोरण विभागाच्या सहयोगी संचालक होत्या.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Biden government will be dominated by women of Indian descent