चीनला मोठा झटका; डिल मोडून यूरोपीय देशाचा अमेरिकेसोबत आण्विक करार

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 11 October 2020

लडाखमध्ये भारतासोबत टक्कर घेणाऱ्या चीनला अनेक झटके बसताना दिसत आहेत.

बुखारेस्ट- लडाखमध्ये भारतासोबत टक्कर घेणाऱ्या चीनला अनेक झटके बसताना दिसत आहेत. यूरोपीय देश रोमानियाने चीनसोबत झालेली डिल रद्द करत अमेरिकेसोबत आण्विक करार केला आहे. त्याचबरोबर रोमानिया सरकारने म्हटलंय की, चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिन राहून काम करणाऱ्या सर्व चिनी कंपन्या पुर्ण जगासाठी धोकादायक आहे.

रोमानियाने चीनसोबतचा तोडला करार

रोमानियाच्या अर्थ मंत्रालयाने 9 ऑक्टोंबर रोजी अमेरिकीसोबतच्या सहयोग आणि आर्थिक कराराला मंजुरी दिली. या करारानुसार डॅन्यूब नदीच्या किनाऱ्यावर दोन आण्विक रिअॅक्टर निर्माण करण्यात येणार आहेत. 2020 च्या सुरुवातीलाच रोमानिया सरकारने चीनसोबतचा करार रद्द केला होता. 

हिवाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

अमेरिका बनवेल रिअॅक्टर

अमेरिकेच्या उर्जा विभागाने आपल्या निवेदनात म्हटलंय की, सचिव डैन ब्रोइलेट आणि रोमानियाचे उर्जा मंत्री वीरगिल पोपस्कु यांनी सिव्हिल न्यूक्लियर पॉवर कार्यक्रमाच्या मसुद्याला अंतिम रुप दिले आहे. हा मसुदा दोन्ही सरकारच्या सहमतीने झाला आहे. 

रोमानिया सरकारने चायना जनरल न्यूक्लियर पॉवर ग्रुपसोबत 5 वर्षांचा करार केला होता. या अंतर्गत चिनी कंपनी रोमानियात 700 मेगावॅटचे दोन न्यूक्लियर रिअॅक्टर तयार करणार होती. मात्र, हा करार रद्द करण्यात आलाय. रोमानियाचे एड्रियन जूकरमन म्हणाले की, चिनी कंपन्या जगासाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे आम्ही करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. 

डोनाल्ड ट्रम्प यांची देवासारखी पूजा करणाऱ्या कृष्णाचा हार्ट अटॅकने मृत्यू

8 बिलियन डॉलरचा खर्च

अमेरिका आणि रोमानियाने आपल्या संयुक्त निवेदनात म्हटलंय की, अमेरिका आण्विक रिअॅक्टर निर्माण करण्यासाठी तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान प्रदान करेल. याशिवाय सर्नवोडा येथील एका उर्जा प्रकल्पाचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. 8 बिलियन डॉलर खर्च येणाऱ्या या प्रकल्पाचे निर्माण अमेरिकीचे कंपनी AECOM करणार आहे.  यामध्ये रोमानिया, कॅनाडा आणि फ्रान्सच्या कंपन्यांचीही मदत घेतली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big blow to China European country breaks deal with china