बिल गेट्‌स पुन्हा जगातील सर्वांत धनवान; कोणाला टाकले मागे?

टीम ई-सकाळ
Saturday, 16 November 2019

नवी दिल्ली :  जगातील सर्वांत धनवान व्यक्तींच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्‌स यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च स्थान मिळविले आहे. ऍमेझॉन कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांची यंदा पीछेहाट झाली आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

#मी_भाजपा_सोडतोय, आता हे कोणी सुरू केले?

नवी दिल्ली :  जगातील सर्वांत धनवान व्यक्तींच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्‌स यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च स्थान मिळविले आहे. ऍमेझॉन कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांची यंदा पीछेहाट झाली आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

#मी_भाजपा_सोडतोय, आता हे कोणी सुरू केले?

"ब्लूमबर्ग बिलिनिअर इन्डेक्‍स' या संस्थेने 500 श्रीमंतांची यादी शुक्रवारी (ता. 15) जाहीर केली आहे. तीत दिलेल्या माहितीनुसार, ऑक्‍टोबर 2017 मध्ये बिल गेट्‌स यांना मागे सारत जेफ बेझोस हे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले होते. सलग दोन वर्षे हे स्थान अबाधित ठेवणारे ते पहिलेच उद्योजक ठरले आहेत. 2019 च्या यादीत मात्र प्रथम स्थानी बिल गेट्‌स यांचे नाव झळकळे असून, बेझोस दुसऱ्या स्थानावर आहेत. गेट्‌स यांच्याकडे सध्या 110 अब्ज डॉलर (अंदाजे 7.89 लाख कोटी रुपये) एवढी संपत्ती आहे. जेफ बेझोस यांच्या मालमत्तेचे मूल्यांकन 109 अब्ज डॉलर (अंदाजे 7.82 लाख कोटी रुपये) आहे. जगातील सर्वांत मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टला गेल्या महिन्यात 10 अब्ज डॉलरचे मोठे काम मिळाल्याने यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणजे गेट्‌स यांच्या मालमत्तेत भर पडली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने 25 ऑक्‍टोबर रोजी मायक्रोसॉफ्टला 10 अब्ज डॉलरचे "क्‍लाउड कॉम्प्युटिंग'चे काम दिले होते. त्या वेळी कंपनीच्या शेअरमध्ये चार टक्‍क्‍यांनी तेजी आली होती. याच काळात ऍमेझॉनच्या शेअरमध्ये दोन टक्‍क्‍यांनी घट झाली. या वर्षी मायक्रोसॉफ्टचा शेअर 48 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. 

तुम्ही दहावी पास आहात का? तुम्हाला या क्षेत्रात मिळेल नोकरी

मुकेश अंबानींचे स्थान कोठे?
"ब्लूमबर्ग'ने जाहीर केलेल्या यादीत 17 भारतीयांनीही स्थान मिळविले आहे. प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांनी पहिल्या 15 मध्ये स्थान मिळविले आहे. सुमारे 56.7 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह ते 14व्या क्रमांकावर झळकले आहेत.

पहिले पाच अब्जाधीश - संपत्ती अब्ज डॉलरमध्ये (कंसात कंपनी)

  1. बिल गेट्‌स (मायक्रोसॉफ्ट) - 110 
  2. जेफ बेझोस (ऍमेझॉन) - 109 
  3. बर्नाड अरनॉल्ट (एलव्हीएमएच) - 103 
  4. वॉरन बफे (बर्कशायर हॅथवे) - 86.6 
  5. मार्क झुकेरबर्ग (फेसबुक) - 74.5 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bill gates again become richest man on earth beats jeff bezos