
भारतीय पोस्ट विभागातर्फे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगाणा यात शाखा डाकपाल, सहाय्यक डाकपाल व ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदासाठी भरती घेण्यात येत आहे. यात महाराष्ट्रात 3 हजार 650 जागा आहेत. यासाठी दहावी उर्त्तीण असलेल्यांना संधी आहे. डाक सेवकांसाठी 10 हजार ते 12 हजार रूपये पगार देण्यात येणार आहे.
औरंगाबाद : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तुमचे वय 35 वर्षापेक्षा जास्त आहे? तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कारण पोस्ट कार्यालयातर्फे देशभरात जंबो भरती घेण्यात येत आहे. 18 ते 40 वयोगटातील दहावी उर्त्तीणांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. यामुळे वाट कसली पाहता, पटकन करा अर्ज आणि व्हा पोस्टाचे कर्मचारी...
भारतीय पोस्ट विभागातर्फे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगाणा यात शाखा डाकपाल, सहाय्यक डाकपाल व ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदासाठी भरती घेण्यात येत आहे. यात महाराष्ट्रात 3 हजार 650 जागा आहेत. यासाठी दहावी उर्त्तीण असलेल्यांना संधी आहे. डाक सेवकांसाठी 10 हजार ते 12 हजार रूपये पगार आहे. तर डाकपाल व ग्रामीण डकासेवकांसाठी 12 हजार ते 14 हजार 500 रूपये पगार देण्यात येणार आहे.
हेही वाचा: फडणवीसांना अहंकार नडला ; पहा कोण म्हणंतय?
असा करा अर्ज
शाखा डाकपाल, सहायक डाकपाल व ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांची ऑनलाईन भरती होत आहे. या ऑनलाईन भरतीसाठी उमेदवारांनी https://indiapost.gov.in या किंवा https://appost.in/gdsonline , http://appost.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. पोस्टाने पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत व ग्राह्य धरले जाणार नाहीत. शाखा डाकपाल, सहायक डाक पाल व ग्रामीण डाक सेवकांच्या पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी ओपन, ओबीसी, ई डब्ल्यू एस पुरूष उमेदवारांसाठी शंभर रूपये शुल्क आहे. सर्व महिला, सर्व एससी, एस टी व सर्व अपंग उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही. 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन पोस्ट विभागातर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा : कॅन्सरच्या रुग्णांना मुंबई,पुण्यापेक्षा जास्त सुविधा..
या तारखेचा पर्यंत ऑनलाईन करा अर्ज
महाराष्ट्रात 1 नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतो. त्यासह आंध्र प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगाणा राज्यातील पोस्टाचा अर्ज भरणे प्रक्रीया 22 ऑक्टोंबरपासून सुरु झाली आहे. 21 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
हेही वाचा : अशी करा परीक्षेची तयारी
राज्य | पदसंख्या | पात्रता | पगार |
महाराष्ट्र | 3650 | 10 उर्त्तीण (मराठी व कोकणी भाषेचे ज्ञान आवश्यक) | 10 हजार ते 12 हजार रूपये |
आंधप्रदेश | 2707 | 10 उर्त्तीण, तेलंगाणा भाषेचे ज्ञान | 10 हजार ते 12 हजार रूपये |
छत्तीसगढ | 1799 | 10 उर्त्तीण, हिंदी भाषाचे ज्ञान | 10 हजार ते 12 हजार रूपये |
तेलंगाणा | 970 | 10 उर्त्तीण, तेलंगाणा भाषेचे ज्ञान | 10 हजार ते 12 हजार रूपये |