अब्जाधीशाचा मुलगा राहतो 500 डॉलर भाड्याच्या घरात 

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 जानेवारी 2020

रशियातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले अब्जाधीश मिखाईल फ्रिडमन, यांचा मुलगा ऍलेक्‍झांडर फ्रिडमन भाड्याच्या घरात राहतो. ऍलेक्‍झांडर 500 डॉलर घरभाडे असलेल्या एका दोन रुमच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहतो. मॉस्कोच्या उपनगरात हा फ्लॅट आहे. ऑफिसमध्ये येण्याजाण्यासाठी तो मॉस्कोतील "सब वे'चा वापर करतो. "मी जे स्वत: कमावतो त्यावर मी जगतो, माझ्या उत्पन्नावर मी माझा जेवण्याचा, राहण्याचा, कपड्यांचा खर्च करतो,' असे ऍलेक्‍झांडरचे म्हणणे आहे.

मॉस्को - रशियातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले अब्जाधीश मिखाईल फ्रिडमन, यांचा मुलगा ऍलेक्‍झांडर फ्रिडमन भाड्याच्या घरात राहतो. ऍलेक्‍झांडर 500 डॉलर घरभाडे असलेल्या एका दोन रुमच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहतो. मॉस्कोच्या उपनगरात हा फ्लॅट आहे. ऑफिसमध्ये येण्याजाण्यासाठी तो मॉस्कोतील "सब वे'चा वापर करतो. "मी जे स्वत: कमावतो त्यावर मी जगतो, माझ्या उत्पन्नावर मी माझा जेवण्याचा, राहण्याचा, कपड्यांचा खर्च करतो,' असे ऍलेक्‍झांडरचे म्हणणे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऍलेक्‍झांडरचे वय 19 वर्षे आहे. त्याचे वडील मिखाईल फ्रिडमन यांच्याकडे 13.7 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. ऍलेक्‍झांडरने लंडन येथे उच्च माध्यमिक शिक्षण घेतले असून, मागील वर्षीच तो लंडनहून मॉस्कोत परतला आहे. पाच महिन्यांपूर्वीच त्याने एसएफ डेव्हलपमेंट नावाने व्यवसाय सुरू केला आहे. त्याच्याकडे पाच कर्मचारी आहेत आणि त्याची उलाढाल चार लाख डॉलर आहे. याशिवाय तो मॉस्कोतील रेस्टोरंटसाठीची वितरकाचे काम करतो. त्याशिवाय पुढील महिन्यात ऍलेक्‍झांडर ब्लॉगरपास नावाची एक ऑनलाईन मार्केटिंग कंपनीदेखील सुरू करणार आहे. आपल्या वडिलांची कोणतीही मदत न घेता ऍलेक्‍झांडरचे काम सुरू आहे. 

चीनमधील विदेशी नागरिकांची मायदेशी रवानगी

रशियात सर्वसाधारणपणे मोठे व्यावसायिक आपल्या मुलांना स्वत:च्याच व्यवसायात व्यवस्थापनावर ठेवून रशियात व्यवसाय करण्यासंबंधीचे बारकावे शिकवत असतात. व्हिक्‍टर राश्नीकॉव्ह या पोलाद उद्योगातील आघाडीच्या उद्योगपतीची मुलगी ओल्गा राश्नीकॉव्ह त्यांच्याच मॅग्नीतोगॉर्स्क आयर्न अँड स्टील वर्क्‍समध्ये संचालक मंडळात आहे. तर ऍन्ड्रे जी गुरयेव यांचा मुलगा त्यांनीच स्थापन केलेल्या खत उत्पादक कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. ऍलेक्‍झांडर मात्र याला अपवाद ठरला आहे.

चीनमध्ये कोरोना व्हायरसचे थैमान; भारताचा मोठा निर्णय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Billionaires son lives in a 500 Dollar rental home