

Big Political Shift in Bangladesh as BNP Leader Mirza Fakhrul Alamgir Becomes President
ESakal
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे उमेदवार मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांना २५५ मते मिळाली. बांगलादेश जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील आघाडीचे उमेदवार कर्नल ओली अहमद यांना ८८ मते मिळाली. संसदेत तीन तास चाललेल्या मतदानानंतर राष्ट्रपती निवडणुकीचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी एएमएम नासिर उद्दीन यांनी निकाल जाहीर केला. राष्ट्रपती निवडणुकीसाठीचे मतदान आज सायंकाळी ५:०० वाजता संपले.