Bob Moore: मालक असावा तर असा; मृत्यूपूर्वी कंपनी 700 कर्मचाऱ्यांच्या नावावर करुन गेला

कर्मचाऱ्याने आपल्या मृत्यूपूर्वीच कर्मचाऱ्यांवर नावावर कंपनी केल्याचं तुम्ही ऐकलं नसेल. पण, असाच प्रकार सत्यात घडला आहे. ( Bob Moore Millionaire Transferred Ownership To 700 Employees)
Bob Moore
Bob MooreEsakal

नवी दिल्ली- आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी मालक कर्मचाऱ्यांची पिळवणूक करतो. त्यांच्याकडून अधिकचे काम करुन घेतो अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण, कर्मचाऱ्याने आपल्या मृत्यूपूर्वीच कर्मचाऱ्यांवर नावावर कंपनी केल्याचं तुम्ही ऐकलं नसेल. पण, असाच प्रकार सत्यात घडला आहे. रेड मिलचे मालक बॉब मुरे यांचे १० फेब्रुवारी २०२४ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. मृत्यूपूर्वीच त्यांनी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या नावावर केलीये.

धान्य उत्पादने आणि कर्मचाऱ्यांप्रती असलेली स्नेहभावना यासाठी बॉब मुरे आणि त्यांची कंपनी ओळखली जाते. मुरे यांनी आपल्या कंपनीच्या मालकीची संचरना वेगळी बनवली होती. कंपनीची मालकी एका समूहाला देण्यापेक्षा त्यांनी ती ७०० कर्मचाऱ्यांच्या नावावर केली. फॉर्च्युनच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आलीये. (Bob Moore Millionaire Transferred Ownership Of His Firm To 700 Employees Here Why)

Bob Moore
Reliance owns Ravalgaon : रावळगावचे मालक अंबानी! महाराष्ट्रातील 82 वर्षे जुनी कंपनी घेतली विकत; 'इतक्या' कोटींची झाली डील

कंपनीचा विकास

२०१० मध्ये मुरे यांनी फक्त कर्मचाऱ्यांसाठी शेअरची मालकी जाहीर केली होती. त्यावेळी कंपनीत २०९ कर्मचारी होते. ८१ व्या वाढदिवशी त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर कंपनीची चांगली वाढ झाली आहे. कंपनीत सध्या ७०० कर्मचारी आहेत. मुरे यांच्या मृत्यूपूर्वीच संपूर्ण कंपनी कर्मचाऱ्यांच्या नावावर झाली होती.

मुरे यांचा मालक आणि कर्मचारी यांच्यामधील संबंधाबाबत खूप उदार विचार होता. त्यांनी पारंपरिक बिझनेस मॉडेलला फाट्यावर मारत कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की कंपनीला झालेला लाभ केवल मालकालाच का मिळावा? लाभ हा कर्मचाऱ्यांना देखील मिळत राहावा.

Bob Moore
MSRDC वांद्रे रिक्लेमेशनचा मोक्याचा 24 एकराचा भूखंड 'अदानी'ने पटकावला; महामंडळाला मिळणार ८ हजार कोटींचा महसूल

बायबलचा अभ्यास

मुरे एकदा म्हणाले होते की, मी सत्तर वर्षांपूर्वीच शिकलो होतो की कठोर मेहनत आणि दयाळूपणा हा यशाचा मंत्र आहे. माझा छोटा व्यवसाय वाढत गेला. त्यामुळे त्यांची परतफेड करण्याची मला संधी होती. बायबलमध्ये माझा एक आवडता श्लोक आहे. तुम्हाला लोकांकडून जी अपेक्षा आहे, तेच तुम्ही लोकांसाठी करायला सुरु करा.

मुरे २०१८ मध्ये कंपनीतून निवृत्त झाले होते. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी या कंपनीची स्थापना केली होती. ते अमेरिकेत गॅस स्टेशन मालक आणि स्टोअर मॅनेजर होते. स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांनी लवकर निवृत्ती घेतली. तसेच त्यांनी आपले आयुष्य बायबलच्या अभ्यासात घालवण्याचं ठरवलं. त्यांच्या कंपनीचे एकूण मूल्य २०१८ मध्ये १०० मिलियन डॉलर इतके होती. बॉब यांची रेड मिल कंपनी ७० देशांमध्ये २०० पेक्षा जास्त धान्य पदार्थ विकते.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com