esakal | थायलंडमध्ये बूस्टर डोस ॲस्ट्राझेनिकाचा; चीनच्या सिनोव्हॅकचा प्रभाव कमी
sakal

बोलून बातमी शोधा

थायलंडमध्ये बूस्टर डोस ॲस्ट्राझेनिकाचा; चीनच्या सिनोव्हॅकचा प्रभाव कमी

थायलंडमध्ये बूस्टर डोस ॲस्ट्राझेनिकाचा; चीनच्या सिनोव्हॅकचा प्रभाव कमी

sakal_logo
By
विनायक होगाडे

बॅकॉंक : थायलंड सरकारने लसीकरण धोरणात बदल केला असून चीनची सिनोव्हॅक लसीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकास आता दुसरा डोस ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाचा देण्यात येणार आहे. थायलंडमध्ये चिनी लस दिल्यानंतरही नागरिकांना कोरोनाची लागण होत असल्याने ॲस्ट्राझेनिकाची लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Booster dose of astrazeneca in Thailand Decreased influence of Chinas Sinovac)

हेही वाचा: प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट

आरोग्यमंत्री अनुतिन चर्नविराकुल यांनी म्हटले की, दोन वेगवेगळे डोस दिल्याने डेल्टा व्हेरियंटविरोधात अधिक सुरक्षा मिळत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे थायलंडच्या नागरिकांना सिनोव्हॅकचा पहिला डोस घेतल्यानंतर तीन ते चार आठवड्यानंतर ॲस्ट्राझेनिकाचा दुसरा डोस दिला जाणार आहे. भारतात ॲस्ट्राझेनिकाची लस कोव्हिशिल्ड नावाने दिली जात असून ती पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादित केली जात आहे.

हेही वाचा: देशातील पहिल्या रुग्णाला दीड वर्षानंतर पुन्हा कोरोनाची लागण

आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस


आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन वर्कसना दोन्ही डोस दिल्यानंतर बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा प्रारंभ आताच केला जात आहे. बूस्टर डोससाठी ॲस्ट्राझेनिका किंवा फायझरची लस दिली जाईल. चर्नविराकुल यांनी म्हटले की, बूस्टर डोसचा निर्णय अमलात आणला नाही तर थायलंडमध्ये दररोज दहा हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून येऊ शकतात आणि मृतांची संख्या शंभराहून अधिक राहू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा शोध घेण्यासाठी घरोघरी चाचणी सुरू करावी, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे. सध्या अपेक्षेपेक्षा कमीच चाचण्या केल्या जात आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

ॲस्ट्राझेनिका लस कशामुळे
थायलंडमध्ये सिनोव्हॅकची लस घेणाऱ्या नागरिकांना देखील कोरोनाची लागण होत आहे. सुमारे ६०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आता त्यांना बूस्टर डोस देण्याचा विचार केला जात आहे.

loading image